Connect with us

मराठी कलाकार

कुशलने “ह्या”कारणामुळे साकारली नाही ‘चला हवा येऊ द्या’मध्ये स्त्री भुमिका.

Actor

कुशलने “ह्या”कारणामुळे साकारली नाही ‘चला हवा येऊ द्या’मध्ये स्त्री भुमिका.

कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती यामुळे चला हवा येऊ द्या हा शो तुफान लोकप्रिय ठरला आहे. थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर रसिकांचे धम्माल मनोरंजन करत असतो. रसिकांचे मनोरंजन करण्यात चला हवा येऊ द्यामधील कलाकार कोणतीही कसर सोडत नाहीत. रसिकांना ते पोटधरुन हसवतात. या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे तो रसिकांना खळखळून हसवतो.

View this post on Instagram

तसा आपला देश कृषिप्रधान कमी आणी पुरुषप्रधान जास्त आहे. जिथे “बेटी बचाव बेटी पढाव” अशी योजना राबवावी लागते. जिथे बाईला पुरुष्याच्या खांद्याला खांदा लाऊन काम कराव लागतं, त्यात ती single parent की मग तर तिला बाप म्हणूनच कर्तव्य पार पाडावी लागतात. अश्या देशात मी “बाई” बनून माझं घर चालवतो याचा मला अभिमान आहे.

A post shared by Kushal Badrike official (@badrikekushal) on

शोमध्ये स्त्री पात्रसुद्धा मोठ्या खुबीने तो साकारतो. हे पात्र साकारतानाही त्याचं कॉमेडीचं अफलातून टायमिंग दिसून येतं. स्त्री पात्र अत्यंत सफाईने आणि मोठ्या खूबीने तो साकारतो. त्यात जराही वावगेपण किंवा अश्लीलपणा वाटत नाही. त्यामुळंच कुशलची स्त्री पात्रंही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. मात्र गेल्या काही दिवसांत चला हवा येऊ द्या या शोमध्य् कुशलने स्त्री पात्र साकारलं नव्हतं. यामागे काय कारण होतं याचा प्रत्येक रसिक विचार करत होता. मात्र आता खुद्द कुशलने यामागचे गुपित उलगडलं आहे.

कुशल सोशल मीडियावर बराच एक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या रसिकांशी कनेक्ट होत संवाद साधतो. त्याने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यात दाढी वाढवलेला कुशल पाहायला मिळतो. एका सिनेमासाठी त्याने ही दाढी वाढवली होती. त्याच्या या सिनेमाच्या शुटिंगचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सिनेमाच्या शुटिंगचा आणि वाढवलेल्या दाढीचा शेवटचा दिवस असं कुशलने पोस्टमध्ये म्हटले आहे. या दाढीमुळेच चला हवा येऊ द्या मधील स्त्री पात्रांना सुट्टी मिळाली होती असं त्याने पुढे या पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र आता दाढी काढल्यावर लवकरच स्त्री पात्रं साकारत थुकरटवाडीत धम्माल करणार असल्याचे संकेत कुशलने दिले आहेत.

Comments

More in Actor

To Top