Connect with us

मराठी कलाकार

दुनियादारी नंतर २०१९ च्या व्हॅलेंटाईन वीकला रसिकांना मिळणार “हे” मल्टीस्टारर सरप्राईझ?वाचा अधिक बातमी.

Upcoming Movies

दुनियादारी नंतर २०१९ च्या व्हॅलेंटाईन वीकला रसिकांना मिळणार “हे” मल्टीस्टारर सरप्राईझ?वाचा अधिक बातमी.

संजय जाधव दिग्दर्शित तू हि रे, प्यारवाली लव्हस्टोरी, गुरू, येरेयेरे पैसा, दुनियादारी हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहे. येत्या व्हॅलेंटाईनला प्रेक्षकांना ते एका नव्याकोऱ्या सिनेमाचं सरप्राईझ देणार आहेत. लकी असं सिनेमाचं नाव असून फिल्ममेकर संजय जाधव यांनी सोशल मीडियावरून आपल्या नव्या चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेची घोषणा केली आहे. ‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला ‘लकी’ सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला रिलीज होणार आहे. एम एस धोनी आणि फ्लाइंग जाट सारख्या हिट सिनेमाची निर्मिती करणारे बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे सुरज सिंग ‘लकी’ सिनेमाव्दारे मराठी सिनेसृष्टीत निर्माते म्हणून पाऊल ठेवत आहे.

सिनेमाचं आणखी महत्वाचं आकर्षण म्हणजे लकी सिनेमातून साऊथ सिनेमा गाजवलेली अभिनेत्री दिप्ती सती मराठीत डेब्यू करत आहे. अभय महाजन आणि दिप्ती सती सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसतील. संजय जाधव म्हणतो, “ व्हॅलेंटाईन्सच्या महिन्यात रिलीज होणारा आमचा रोमँटिक-कॉमेडी सिनेमा तरूणाईला खूप आवडेल, असा आमचा विश्वास आहे. तुमच्या संपूर्ण कुटूंबासोबत तुम्ही हा सिनेमा पाहू शकाल आणि तुमचं दोन तास भरपूर मनोरंजन होईल, ह्याची मला शाश्वती आहे.”

यावर्षी जून महिन्यात संजय जाधव यांनी या सिनेमाचे पोस्टर लॉन्च केले होते. तसंच हा सिनेमा डिसेंबर २०१८मध्ये रसिकांच्या भेटीला येईल असेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र सिनेमाच्या स्टारकास्टबाबत त्यांनी काहीही सांगितलं नव्हतं. सिनेमाचे शुटिंग पूर्ण झाल्यावर याबाबत माहिती देऊ असं त्यांनी म्हटलं होते. लकी’ या सिनेमात मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार मंडळी झळकणार असल्याची बातमी आहे.  उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, श्रेया बुगडे आणि सोनाली खरे यांचायांत समावेश आहे. ‘लकी’ सिनेमाच्या या तगड्या स्टारकास्टमध्ये अमेय वाघचाही समावेश असल्याचं कळत आहे.

Comments

More in Upcoming Movies

To Top