Connect with us

मराठी कलाकार

“हे”विवस्त्र हिरो असलेलं पोस्टर करतंय जाम धमाल.पहा पूर्ण पोस्टर.

News

“हे”विवस्त्र हिरो असलेलं पोस्टर करतंय जाम धमाल.पहा पूर्ण पोस्टर.

नुकतंच ‘लकी’ या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं असून सध्या हे पोस्टर सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे आणि त्याला कारणंही तसंच आहे म्हणा कारण पोस्टरवरील हिरो चक्क ‘विवस्त्र अवतारात दिसत आहे. दुनियादारी, तू हिरे, प्यार वाली लव्ह स्टोरी आणि अलिकडेच आलेला ये रे ये रे पैसा असे एकाहून एक दर्जेदार मराठी चित्रपट बनवणारे निर्माते संजय जाधव, यांचा हा नवा चित्रपट आहे. बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे सुरज सिंग यांनी ‘लकी’ चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. सुरज यांनी एम एस धोनी आणि फ्लाइंग जाट या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

‘लकी’ चित्रपटाच्या पोस्टरवरील अभिनेता अभय महाजन विवस्त्र अर्थात कपडे न घातलेल्या आणि कमरेला ट्यूब लावलेल्या अवस्थेत, रस्त्यावरुन धावताना दिसत आहे. मराठी चित्रपटांच्या इतिहासात पोस्टरवर पहिल्यांदाच असा ‘क्लॉथलेस’ हिरो झळकल्यामुळे, त्याची विशेष चर्चा होते आहे.

याविषयी बोलताना ‘लकी’चे निर्माते सुरज सिंग म्हणाले, ‘मराठी तरूण आणि मराठी चित्रपट कात टाकत आहे. लकी हा चित्रपटही आजच्या तरूण पिढीवर आधारित असल्यामुळे, चित्रपट पाहताना तुम्हाला अनेक आश्चर्यकारक धक्के बसणार आहेत. काहीतरी हटके पण कथेला आणि नायकला साजेसं असं हे खास पोस्टर्स सर्वांना नक्कीच आकर्षित करेल याची खात्री आहे.’ संजय जाधव मराठी सिनेसृष्टीत निखळ मनोरंजनासाठी ओळखले जातात. त्यामुळे आमचा हा चित्रपट तशाच धाटणीचा आणि प्रेक्षकांचा फूल टू मनोरंजन करणारा असल्याचं, सुरज सिंग सांगतात.

Comments

More in News

To Top