Connect with us

मराठी कलाकार

“कलंक”मधील माधुरीचा जबरदस्त लूक आऊट.पहा फोटोज.

News

“कलंक”मधील माधुरीचा जबरदस्त लूक आऊट.पहा फोटोज.

मधुरा साने आठवतेय का? ती काही महिन्यांपूर्वीच आपल्याला एका छानशा मराठी सिनेमातून भेटीला आली होती. नाही आठवली? अहो आम्ही बोलतोय आपल्या सर्वांची लाडकी धकधक गर्ल माधुरी दिक्षित-नेने बद्दल! काही महिन्यांपूर्वी माधुरीने मराठमोळा सिनेमा “बकेट लिस्ट” आपल्याला भेटीस आणला होता. यातील अभिनयाबद्दल तिची खूप प्रशंसा झाली होती. तसेच “बकेट लिस्ट”चं बॉक्सऑफिस कलेक्शन सुद्धा चांगलं राहिलेलं होतं. आता त्यानंतर माधुरी पुन्हा एका बॉलिवूड सिनेमाद्वारे चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. आणि या सिनेमातील तिचा जबरदस्त आऊट झालेला लूक आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

करण जोहरने कलंक या चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. सध्या या चित्रपटातील कलाकारांचे लूक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबत नक्कीच उत्सुकता आणखी वाढली आहे.कलंक या चित्रपटात माधूरी दिक्षीतही मुख्य भुमिकेत दिसणार आहे. माधूरीचा लूक रिव्हील करण्यासाठी करण जोहरने खास मुहूर्त साधला होता. महिला दिना दिवशी करणने माधूरीचा लूक रिव्हील केला. लाल रंगाच्या घागऱ्यामध्ये माधूरीचा पहिला लूक समोर आला आहे. या लाल घागऱ्यात माधूरी खूपच सुंदर दिसत आहे.त्याचप्रमाणे तीची ज्वेलरी ही लक्ष वेधून घेत आहे.

चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत, आलिया भट आणि वरूण धवन यांच्याबरोबर आदित्य रॉय कपूर, कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची स्टार कास्ट दमदार असल्याने या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत.१७ एप्रिलला “कलंक” चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Comments

More in News

Like Us on Facebook

Popular Posts

To Top