Connect with us

धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने करतेय मराठी सिनेमा – बकेट लिस्ट

bucket list marathi movie madhuri dixit

News

धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने करतेय मराठी सिनेमा – बकेट लिस्ट

लाखो हृदयांची धड्कन असलेली धकधक गर्ल माधुरी दिक्षित-नेने हिंदी नंतर आता मराठी सिनेमात पाऊल ठेवते आहे. पहिलेच माधुरीने मराठी माणूस आणि संस्कृतीची जगातील सर्वात मोठ्या अशा बॉलीवूड इंडस्ट्रीशी नाळ बांधून ठेवली आहे. दोन दशकं तिने हे काम अविरतपणे केलं आहे. आणि आता नुकतीच जशी ती अमेरिकेतून भारतात स्थायिक झाली तशाच ती लवकरच एक मराठी चित्रपट करणार असल्याच्या अफवांना पेव फुटले होते. शेवटी हि अफवा आता खरी ठरत असल्याचं दिसते आहे. हो! अगदी खरं! माधुरी एक मराठी सिनेमा करत असून त्याच नाव ‘बकेट लिस्ट’ असं आहे. सिनेमाची टॅगलाईन ‘माझी, तुमची, आपल्या सगळ्यांची’ अशी दिसते.

Bucket-List-Upcoming-Marathi-Film-Madhuri-Dixit

खरं तर माधुरीने मराठी सिनेमात यायला वेळ लावला. पण सध्याचं वातावरण पाहता ते मराठी सिनेमा आणि माधुरी दोघांनाही एकत्र यायला अनुकूल आहे.  याआधी आलेल्या गुलाब गँग मधून माधुरीने तिचा बहारदार अभिनय केला होता. आता ह्या सिनेमात माधुरी मध्यमवर्गीय स्त्रीची भुमिका करत असल्याचं पोस्टवरूनतरी दिसतंय. पोस्टरवर अजून बायको, आई, मित्र, बहीण असे शब्दही आहेत. सिनेमाचं दिगदर्शन विजय देवस्कर करत आहेत. यानंतर सुद्धा बॉलीवुड कॉमेडी सिरीज ‘धमाल’ च्या तिसऱ्या पार्ट मध्ये माधुरी काम करत असल्याचं कळतंय. ‘टोटल धमाल’ असं नाव असलेल्या सिनेमात आपल्याला अजून अनिल कपूर, अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी हे कलाकार सुद्धा बघायला मिळतील. जसं माधुरीने आजवर हिंदी सिनेमांसाठी प्रेक्षकांची गर्दी खेचली आहे तसंच ती आता मराठी सिनेमाला करू शकेल का हे आता आपल्याला येत्या उन्हाळयात दिसेलच!

Comments

comments

Continue Reading
Advertisement
You may also like...
Click to comment

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

More in News

Like Us on Facebook

Advertisement

Popular Posts

To Top