Connect with us

मराठी कलाकार

बिगबॉसच्या घरातून मैथिली जावकर एलिमिनेट!वाचा अधिक.

बिग बॉस मराठी

बिगबॉसच्या घरातून मैथिली जावकर एलिमिनेट!वाचा अधिक.

बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व सुरु होऊन आता 2 आठवडे झाले आहेत. पहिल्या आठवड्यात नॉमिनेशन्स झाले नसले तरी या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बेघर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आठवड्यात मैथिली जावकर, अभिजीत केळकर, पराग कान्हेरे, नेहा शितोळे, वीणा जगताप, माधव देवचक्के नॉमिनेट झाले आहेत. त्यापैकी मैथिली जावकर किंवा माधव देवचक्के या दोघांपैकी एकजण घराबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि ती खरीच ठरली, प्रेक्षकांकडून मिळालेल्या कमी वोट्स आणि प्रतिसादामुळे शेवटी मैथिली जावकरचं एलिमिनेशन काल झालं आहे.

बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. या आठवड्यामध्ये पराग कान्हेरे, अभिजीत केळकर, विणा जगताप, मैथिली जावकर, माधव देवचके आणि नेहा शितोळे हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले होते. आता या सहा जणांमधून आज कोणाला घरा बाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते.

शेवटी अभिजीत केळकर आणि मैथिली जावकर हे डेंजर झोन मध्ये होते आणि महेश मांजरेकर यांनी घोषित केले कि, या आठवड्यामध्ये मैथिली जावकर हीला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागणार आहे. महेश मांजरेकर यांनी घरातून बाहेर आल्यावर मैथिलीला तिच्या घरामधल्या अनुभवाबद्दल विचारले, तेंव्हा ती म्हणाली माझ्यासोबत सगळेच अगदी उद्धट, उर्मट अगदी निवडून या घरामध्ये आणले आहेत, जे दुसऱ्यांचं अजिबात ऐकत नाहीत. घरामध्ये कोण तुला मित्र म्हणून मिळालं असं विचारले तेंव्हा मैथिलीने सांगितले नेहा सोडून घरामध्ये सगळेच मला जवळचे होते आणि आहेत. सगळ्यांशी माझी घट्ट मैत्री झाली. बिचुकले यांनी मला धाकटी बहीण तर माधवने मला मोठी बहीण म्हंटल, मला या घरामध्ये दोन भाऊ मिळाले असे मी म्हणेन.

Comments

More in बिग बॉस मराठी

Like Us on Facebook

Popular Posts

To Top