Connect with us

मराठी कलाकार

‘लकी’ सिनेमातील‘माझ्या दिलाचो’गाणं चैतन्य देवढेच्या आवाजात.पहा व्हीडिओ.

Video Songs

‘लकी’ सिनेमातील‘माझ्या दिलाचो’गाणं चैतन्य देवढेच्या आवाजात.पहा व्हीडिओ.

‘दुनियादारी’ सिनेमातून ‘लिटील चॅम्प’ रोहित राऊतला सिनेसृष्टीत लाँच केल्यावर आता ‘राइझिंग स्टार’ चैतन्य देवढेलाही संजय जाधव ह्यांनी लकी सिनेमातून चित्रपटसृष्टीत लाँच केले आहे. संजय जाधव दिग्दर्शित लकी सिनेमाचे ‘माझ्या दिलाचो’ हे कोंकणी गाणे रिलीज झाले आहे. सूर नवा ध्यास नवा रिएलिटी शोमधून दिसत असलेल्या चैतन्यचे हे पहिले मराठी गाणे आहे. अभंग आणि माऊलींच्या गाण्यांनी मंत्रमुग्ध करणार्‍या चैतन्याच्या आवाजात ‘माझ्या दिलाचो..’ हे सॉफ्ट रोमॅन्टिक गाणं ऐकण्याची मज्जा काही औरच आहे.

 

चित्रपटामध्ये अभय महाजन आणि दीप्ती सती यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. ‘लकी’ या मराठी सिनेमामध्ये पंकज पडघन आणि अमितराज या दोन संगीतकारांनी गाणी दिली आहेत. चैतन्य देवढे हा ‘सूर नवा…’ च्या अंतिम सहा स्पर्धकांपैकी एक आहे. या रिअ‍ॅलिटी शोचा निकाल लागण्यापूर्वीच चैतन्यला सिनेमासाठी पार्श्वगायनाची संधी मिळाली आहे. पंकज पडघन या संगीतकाराने संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला चैतन्यने स्वरसाज चढवला आहे.

चैतन्यच्या निवडीविषयी लकी सिनेमाचे निर्माते सूरज सिंग सांगतात, “ह्या गाण्याच्या सिच्युएशनसाठी आम्हाला एका लहान मुलाचा आवाज हवा होता. आणि दिग्दर्शक संजय जाधव ह्यांना चैतन्यचा आवाज खूप आवडला. आळंदीच्या चैतन्यला आवाजाचे दैवी देणगीच मिळालीय. त्याच्या आवाजातली निरागसता ह्या गाण्याला अगदी साजेशी आहे. आणि अभयने ही हे गाणे रूपेरी पडद्यावर उत्तम साकारलंय.”

Comments

More in Video Songs

To Top