Connect with us

मराठी कलाकार

सोनाली-सिद्धार्थची मराठी वेब सीरिज”मनातल्या मनात”.

News

सोनाली-सिद्धार्थची मराठी वेब सीरिज”मनातल्या मनात”.

वेबसिरीजच्या जोमात वाहणाऱ्या वाऱ्याच्या युगात चित्रपट, मालिका यांना नवं आव्हान उभं राहिलं आहे. हल्लीच्या दिवसांमध्ये कलाकार वेबसिरीजला प्राधान्य देताना दिसतात. हिंदी माध्यमांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांप्रमाणे मराठी कलाकार नवनवीन वेबसिरीजमध्ये सध्या दिसत आहे. लवकरच मराठीतली अप्सरा सोनाली कुलकर्णी आणि चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर एका वेबसिरीजमध्ये दिसणार आहेत.

‘मनातल्या मनात’हि सोनाली-सिद्धार्थची मराठी वेब सीरिज ८ एप्रिलपासून प्रेक्षकांची भेटीला आली आहे. ही वेबसिरीज शेमारूमीवर प्रदर्शित झाली आहे. पाच एपिसोड्सची ही वेब मालिका आहे. या कॉमेडी वेबसिरीजचे लेखन शिरीष लाटकर यांनी केलं आहे. तर दिग्दर्शन संदीप नवरे यांचे आहे. मनातल्या मनात हा माझी डिजीटल प्लॅटफॉर्मवरील माझी पहिली मालिका आहे. त्यामुळे मी खूप उत्साही आहे. गेले काही वर्ष सतत चित्रपटांमध्ये व्यस्त होते. वेबसिरीजच्या दुनियेत पदार्पण करताना मला खूप आनंद होत आहे. हा एक खूप छान अनुभव होता. आता अशा अनेक वेबसिरीजमध्ये काम करण्याची मला इच्छा आहे. असं यावेळी बोलतांना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली.

‘मनातल्या मनात’ ही ५ भागांची मालिका आहे. या ५ एपिसोडच्या मालिकेत अभिषेक आणि शिवानी यांचे आयुष्य यात दाखवण्यात आलं आहे. ते लग्न करणार आहेत. अभिषेक आणि शिवानी यांची व्यक्तिमत्वे आणि विचारसरणी वेगवेगळी आहे. या पाच भागात अभिषेक आणि शिवानी यांच्या लग्नाआधीच्या पाच भेटी दाखवण्यात आल्या आहेत.

Comments
Continue Reading
You may also like...

More in News

To Top