Connect with us

मराठी कलाकार

क्रूर खलनायकाच्या भूमिकेत झळकणार मंगेश देसाई.आगामी चित्रपट”जजमेंट”.

Actor

क्रूर खलनायकाच्या भूमिकेत झळकणार मंगेश देसाई.आगामी चित्रपट”जजमेंट”.

मंगेश देसाई, वैविध्यपूर्ण भूमिका साकारून अवघ्या महाराष्ट्रावर आपली छाप पाडणारे चतुरस्त्र एक अभिनेते. आजवर त्यांनी प्रेमकथा, विनोदी, कौटुंबिक, रहस्यमय, चरित्रपट अशा विविध धाटणीच्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला. मात्र आता ‘जजमेंट’ या चित्रपटाच्या माध्यमातून ते प्रथमच खलनायकाच्या भूमिकेत पडद्यावर झळकणार आहेत. आजवर त्यांनी आपल्या भूमिकेच्या माध्यमातून समाजातील अनेक चांगली – वाईट व्यक्तिमत्वे आपल्या समोर आणली, परंतु अशा प्रकारची नकारात्मक भूमिका ते पहिल्यांदाच साकारत आहेत.

आगामी ‘जजमेंट’ या चित्रपटाच्या माध्यमातून ते प्रथमच खलनायकाच्या भूमिकेत पडद्यावर झळकणार आहेत. एका आयएएस ऑफिसरची भूमिका ते या चित्रपटात साकारत असून अंगावर शहारे आणणारी ही व्यक्तिरेखा आहे. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणाऱ्या या थरारपटात मंगेश देसाईसोबत तेजश्री प्रधानचीही मध्यवर्ती भूमिका आहे. तेजश्रीची भूमिकाही तितक्याच ताकदीची आणि निर्भीड आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित आणि डॉ. प्रल्हाद खंदारे व हर्षमोहन कृष्णात्रेय निर्मित ‘जजमेंट’ या चित्रपटात प्रेक्षकांना भरभरून थरार अनुभवायला मिळेल यात शंका नाही. हा चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होत आहे.

माणसांमध्ये इतकी विकृती असू शकते, याचा विचार करण्यास भाग पाडणाऱ्या या भूमिकेविषयी मंगेश देसाई म्हणतात, “खरंतर एक कलाकार म्हणून आम्ही ‘स्विच ऑन, स्विच ऑफ’ पटकन होतो. परंतु हा चित्रपट त्याला अपवाद आहे. ही व्यक्तिरेखा मला शुटिंगनंतरही विचार करण्यास प्रवृत्त करायची. मुळात वैयक्तिक आयुष्यात मी असा अजिबात नाही. तरीही एक अभिनेता म्हणून मी ‘या’ भूमिकेला माझ्याकडून पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. पॅकअप झाल्यावर जेव्हा मी मंगेश असायचो तेव्हा मात्र ही व्यक्तिरेखा मला भावनिकदृष्ट्या खूपच निराश करायची. अनेकदा मला वाईटही वाटायचे. इतकी ही भूमिका क्रूर आणि भयंकर आहे.”

Comments

More in Actor

Like Us on Facebook

Popular Posts

To Top