Connect with us

मराठी कलाकार

स्वप्नील जोशीचा हा रोमँटिक अंदाज तुम्ही चुकवलात तर नाही?पहा व्हीडिओ.

Video Songs

स्वप्नील जोशीचा हा रोमँटिक अंदाज तुम्ही चुकवलात तर नाही?पहा व्हीडिओ.

सोपं काम अवघड करणारे मित्र कठीण असतात… या टॅगलाइनसह नुकतेच एक पोस्टर ‘मोगरा फुलला’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रकाशित केले होते. येत्या १४ जून रोजी ‘मोगरा फुलला’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील कलाकारांच्या लुकला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या चित्रपटामध्ये नेमकं काय काय पहायला मिळणार याबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यातूनच अजून एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊत याने संगीतबद्ध केलेले व गायलेले ‘मोगरा फुलला’ मधील श्रवणीय असे ‘मनमोहिनी’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे आणि या गाण्याला प्रेक्षकांचा देखील भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटातील नायकाच्या म्हणजे सुनील कुलकर्णीच्या मित्राची भूमिका अभिनेता संदीप पाठक साकारत आहे. चित्रपटातील पहिले ‘मनमोहिनी’ हे रोमँटिक गाणे नुकतेच सोशल मीडियावरून प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यामध्ये स्वप्नील जोशी बरोबर सई देवधर हा नवोदित चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘मनमोहिनी’ या गाण्यामधून चित्रपटामध्ये सई देवधर ही स्वप्नील जोशीची मनमोहिनी आहे असे दिसत असून या गाण्यातून या सुंदर जोडीचा उत्तम अभिनय आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

“मनमोहिनी आज पाहिली, छबी तिची पाहता मनी राहिली…” असे या गाण्याचे मंत्रमुग्ध करणारे बोल असून हे गाणे बघितल्यावर प्रेक्षकांना आपल्या मनमोहिनीची आठवण येईल यात काही शंका नाही. त्याचबरोबर ‘मनमोहिनी’ हे गाणे तरुणाईच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखला जाणारा गायक रोहित श्याम राऊत याने स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केले आहे.या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि सई देवधर यांच्याबरोबर चंद्रकांत कुलकर्णी, संदिप पाठक, नीना कुळकर्णी, सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आनंद इंगळे, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

Comments

More in Video Songs

Like Us on Facebook

Popular Posts

To Top