Connect with us

मराठी कलाकार

मराठी सिनेमातील हाय क्वालिटी ऍक्शनपॅक ‘फाईट’.आगामी सिनेमा.

Featured

मराठी सिनेमातील हाय क्वालिटी ऍक्शनपॅक ‘फाईट’.आगामी सिनेमा.

टिपिकल लव्हस्टोरीज, कॉमेडी, फॅमिली ड्रामा ह्या जॉनरची कित्येक दर्जेदार सिनेमे मराठी इंडस्ट्रीने प्रेक्षकवर्गांच्या भेटीस आणले आहेत. ऍक्शन जॉनरची गोष्ट आली कि मात्र त्यात अगदी सुमार सिनेमे आपल्याला बघायला मिळतात, मात्र इंडस्ट्रीतील हि भर भरून काढण्यासाठी आता एक नवाकोरा, करकरीत ऍक्शन सिनेमा आपल्या भेटीस येणार असून त्याचं नाव ‘फाईट’ असं आहे. सिनेमा अगदीच वेगळ्या प्रकारातील दिसत असून यातील ऍक्शन अगदी हाय क्वालिटी आहे.

फ्युचर एक्स प्रोडक्शनची निर्मिती असलेला ह्या सिनेमातून डॅशिंग हिरो ‘जीत’ आपलं पदार्पण करणार आहे. सिनेमाचं टिझर पोस्टर अगदी ऍक्शन हिरो अवतारातील असून सिनेमाचे निर्माते ललित ओसवाल आणि सिनेमाची संपूर्ण टीम सिनेमाबद्दल विश्वासपूर्ण असल्याचं दिसत आहे. मराठी सिनेमातील हाय क्वालिटी फाईटिंग ऍक्शन असलेला हा सिनेमा सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस येईल असा विश्वास आहे.

Comments

More in Featured

To Top