Connect with us

मराठी कलाकार

लवकरच आई होणार आहे क्रांती रेडकर. पहा डोहाळे जेवणाचे फोटोज.

News

लवकरच आई होणार आहे क्रांती रेडकर. पहा डोहाळे जेवणाचे फोटोज.

हल्ली बॉलिवूडमध्ये या ना त्या लग्नाची गडबड सुरू आहे तिथे मराठी सिनेसृष्टीत एक गोड बातमी मिळणार आहे. मराठी सिनेमातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री सध्या प्रेग्नन्ट आहे. लवकरच आता एक नवा पाहुणा या अभिनेत्रींच्या घरी येणार असून सध्या सर्वत्र याची चर्चा सुरु आहे. या चिमुकल्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी घरातील मंडळीसहित मराठीतील सर्व सिनेकलाकार आतुर आहेत. आई होणारी हि अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून क्रांती रेडकर आहे!

View this post on Instagram

PC : @hisnameisaakash

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar) on

क्रांतीने तिचं लग्नसुद्धा अगदी साध्या आणि गुपचूप पद्धतीने केलं होतं. २०१७ साली समीर वानखेडेंशी तिचा विवाह झाला होता. पती समीर वानखेडे हे देशसेवेत कार्यरत असल्यामुळे त्यांची ओळख गुलदस्त्यातच आहे. क्रांतीनेसुद्धा आतापर्यंत तिच्या नवऱ्याचा एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. त्याचप्रमाणे आता तिची गोड बातमी देखील लपवण्यात आली आहे. आता क्रांती आई होणार असल्यामुळे रेडकर आणि वानखेडे दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण पसरल्याचं सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच क्रांती रेडकरच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत क्रांती रेडकर अतिशय सुंदर दिसत आहे.

View this post on Instagram

#jiofilmfareawards2018

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar) on

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in News

To Top