Connect with us

मराठी कलाकार

रसिकांचे प्रयत्न छान,पण बिगबॉसचा होता एप्रिल फुल प्लॅन!

बिग बॉस मराठी

रसिकांचे प्रयत्न छान,पण बिगबॉसचा होता एप्रिल फुल प्लॅन!

मराठीमधील बिग बॉसच्या पहिल्या पर्वाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता रसिकांना बिग बॉस मराठी-2चं पर्व कधी सुरू होणार याची उत्सुकता लागली आहे. बिग बॉसचं घर आता सीझन 2 साठी सज्ज होत आहे. रविवारी रात्रीच बिग बॉस मराठीच्या ऑफिशिएअल ट्विटर अकाऊंटवरून ‘आता अनाऊसमेंट्ची वेळ आली आहे.’ अशा आशयाची एक पोस्ट आली. त्यानंतर 1 एप्रिलच्या सकाळी बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार्‍या काही स्पर्धकांच्या नावाच्या अद्याक्षराची एक पोस्ट शेअर करण्यात आली.

पोस्ट लाईव्ह झाल्यानंतर रसिकांनी त्यांचे अंदाज बांधले. मात्र अजूनही कोणाच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हा केवळ एप्रिल फूल असल्याचं सांगण्यात आलं आहे. बिग बॉसच्या घरामध्ये यंदा रसिका सुनील, कलर्स मालिकेवरून निरोप घेतलेल्या ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेतील अक्षया गुरव, अर्चना निपाणकर आदी कलाकार झळकण्याची चर्चा आहे. केतकी माटेगावकरनेही तिच्या बिग बॉसच्या घरातील प्रवेश या अफवा असल्याचं म्हटलं आहे. अभिनेता शैलेश दातार, अक्षया गुरव, वीणा जगताप, अर्चना निपणकर, गौतम जोगळेकर हे कलाकार बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात दिसणार असल्याचे बोललं जात आहे.

बिग बॉस मराठीच्या पहिला मोसमाचं सूत्रसंचालन ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांनी केलं होतं. आता दुसऱ्या पर्वातही महेश मांजरेकरच सूत्रसंचालन करताना दिसणार असल्याची बातमी आहे. बिग बॉसच्या नियमांनुसार शो सुरू होण्यापूर्वी त्यामधील कलाकारांची नावं जाहीर केली जात नाहीत. स्पर्धकांनाही नावं गुप्त ठेवण्याबाबत करार साईन करून घेतला जातो. बिग बॉसचा टीझर रसिकांसमोर आला मात्र अद्याप शो ऑन एअर कधी जाणार? याची घोषणा करण्यात आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, निर्मात्यांनी 14 एप्रिल आणि 21 एप्रिल या दोन तारखांचा लॉन्चिंगसाठी प्रस्ताव ठेवला आहे. पण यावर अजूनही काम सुरु असल्याचं कळतं.

Comments

More in बिग बॉस मराठी

To Top