Connect with us

मराठी कलाकार

मराठी सेलेब्स आणि त्यांचे बेस्ट फ्रेंड्स. मराठीकलाकार फ्रेंडशिप-डे स्पेशल.

News

मराठी सेलेब्स आणि त्यांचे बेस्ट फ्रेंड्स. मराठीकलाकार फ्रेंडशिप-डे स्पेशल.

सचिन पिळगांवकर – अशोक सराफ
सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ यांची मैत्री मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट दिले असून सचिन यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात आपल्याला नेहमीच अशोकला पाहायला मिळते.

पुष्कर श्रोती आणि प्रसाद ओक
पुष्कर आणि प्रसाद यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एका चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाचे चित्रीकरण २५ दिवस नेपाळमध्ये झाले होते. यावेळी ते दोघे रूम पार्टनर असल्याने त्यांच्यात खूप चांगली मैत्री झाली. आजही त्यांची मैत्री कायम आहे.

View this post on Instagram

यारों का यार दिल ए दिलदार आत्याचा लाडका भाच्चा माणूस एकदम सच्चा पुतण्या विनूकाकांचा खऱ्या आणाभाकांचा अनेक कलाकारांचा मुकादम कामं देतो त्यांना एकदम सर्वांवर प्रेम करतो प्रांजळ भरून प्रांजल ची ओंजळ ध्येय त्याचं सगळ्यांना खूष कर असा आमचा लाडका पुष्कर…!!! मित्रा @shrotripushkar तुला 50 व्या वर्धापनदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि भरभरून प्रेम…!!!

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

उर्मिला कानेटकर – क्रांती रेडकर
उर्मिला कानेटकर आणि क्रांती रेडकर एकमेकांच्या अनेक वर्षांपासून खूप चांगल्या फ्रेंड्स आहेत. क्रांतीने दिग्दर्शित केलेल्या काकण या पहिल्या चित्रपटात देखील आपल्याला उर्मिलाला मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते.

नेहा पेंडसे – श्रुती मराठे
नेहा पेंड्से आणि श्रुती यांच्या मैत्रीची नेहमीच चर्चा ऐकायला मिळते. त्या दोघी त्यांच्या चित्रीकरणात कितीही व्यग्र असल्या तरी त्या एकमेकींसाठी नेहमीच वेळ काढतात. त्या दोघींचे अनेक फोटो आपल्याला सोशल मीडियावर देखील पाहायला मिळतात.

भरत जाधव – अंकुश चौधरी – केदार शिंदे
भरत जाधव, अंकुश चौधरी आणि केदार शिंदे यांची मैत्री त्यांच्या स्ट्रगलिंग काळापासूनची आहे. त्या तिघांनीही आता मराठी चित्रपटसृष्टीत आपली जागा निर्माण केली असून त्यांच्या मैत्रीचे किस्से ते अनेकवेळा मुलाखतींमध्ये शेअर करतात.

तेजस्विनी पंडित – स्पृहा जोशी
नांदी या नाटकादरम्यान स्पृहा आणि तेजस्विनी यांची मैत्री झाली. आज इतक्या वर्षांनी देखील त्यांची मैत्री टिकून आहे.

स्वप्निल जोशी – सई ताम्हणकर
स्वप्निल आणि सई यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची पहिली ओळख ही गिरिजा ओकमुळे झाली होती. त्यांच्याच काहीच दिवसांत मैत्री झाली आणि त्यांचे हेच बॉण्डिंग आपल्याला त्यांच्या चित्रपटात देखील पाहायला मिळते.

Comments

More in News

Like Us on Facebook

Popular Posts

To Top