Connect with us

मराठी कलाकार

दर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.

Television

दर्जेदार मालिका देण्यासाठी वाढणारी स्पर्धा.मराठीकलाकार विशेष.

आजकाल जे क्षेञ बघावं त्यात चढाओढ सुरु आहे. त्या त्या क्षेत्रातील स्पर्धकांमध्ये कमालीची स्पर्धा आजच्या जमान्यात बघायला मिळते. तशीच काहीशी स्पर्धा मराठी मनोरंजन वाहिन्यांमध्ये सध्या चालू आहे. सुरुवातीस केवळ झी मराठी आणि कलर्स मराठी एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते, पुढे त्यात स्टार प्रवाह वाहिनीची भर पडली. आणि आता तर सोनी मराठी वाहिनीच्या आगमनामुळे चार तगड्या ब्रँडस मध्ये हि चढाओढीची रेस लागल्याचं चित्र आहे.

एकीकडे स्टार प्रवाह ही वाहिनी आपल्या पद्धतीने थोडासा प्रेक्षकवर्ग मिळवण्याचा प्रयत्न करत होती. अभिनेते, दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी प्रमुख अधिकारी या नात्याने सूत्रे हाती घेतली आणि स्पर्धा म्हणण्यापेक्षा प्रेक्षकांना आकर्षून घेता येईल अशा गोष्टींना महत्त्व दिले. एक नव्हे, दोन नव्हे तर मार्च, एप्रिल या दरम्यान चार-पाच तरी मालिका तुमच्यापर्यंत पोहोचतील अशी जोरदार तयारी केली आहे. रुपेरी पडद्यावरचे स्टार म्हणावेत असे स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर यांच्यासोबत मधुरा देशपांडे या मालिकेत दिसणार आहेत. स्वप्नीलचे बर्‍याच वर्षांनी छोट्या पडद्यावर आगमन होणार आहे. अमृता पहिल्यांदाच दैनंदिनी कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

दुसरीकडे झी मराठी स्वराज्यरक्षक संभाजी, तुला पाहते रे, तुझ्यात जीव रंगला ह्या मालिकांनी टीआरपी चे उचांक गाठत असल्याचं बघायला मिळतं आहे. घाडगे अँड सून, राधा प्रेम रंगी रंगली, मन हे बावरे ह्या मालिकांसोबत कलर्स मराठीसुद्धा इतर वाहिन्यांना तेवढीच जोरदार टक्कर देत असल्याचंही चित्र आहे. सोनी मराठी वाहिनीसुद्धा हम बने तुम बने, सारे तुझ्याच साठी, एक होती राजकन्या, भेटी लागी जीवा असल्या दर्जेदार मालिकांची मेजवानी रसिकांना देत आहे. काहीही असू द्या, वाहिन्यांच्या ह्या स्पर्धेमुळे मराठी रसिकांना मात्र दर्जेदार मालिका बघायला मिळतील यात काही वाद नाही.

Comments

More in Television

Like Us on Facebook

Popular Posts

To Top