Connect with us

मराठी कलाकार

मराठी फिल्मफेअर पुरस्कार-२०१८ची क्षणचित्रे, अमेय वाघ ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर सोनाली कुलकर्णी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री.

News

मराठी फिल्मफेअर पुरस्कार-२०१८ची क्षणचित्रे, अमेय वाघ ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर सोनाली कुलकर्णी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री.

मनोरंजन विश्वातील कलाकारांचे कौतुक करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला एक सोहळा म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार. यंदा या पुरस्कार सोहळ्याचे चौथे पर्व असून चित्रपटसृष्टीतील अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार (मराठी)२०१८ चा सोहळा आज मुंबईच्या गोरगाव येथील नेस्को ग्राऊंडमध्ये पार पडला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने अभिनेता अमेय वाघ याला मुरंबा सिनेमासाठी गौरविण्यात आले तर “कच्चा लिंबू” या सिनेमासाठी सोनाली कुलकर्णीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

अनेक सेलिब्रिटींनी या भव्यदिव्य सोहळ्याला हजेरी लावली होती. आपल्या बहारदार सूत्रसंचालनाने अमेय वाघ आणि सुरवत जोशी यांनी सोहळ्याची लज्जत वाढवली तर दुसरीकडे हिंदी अभिनेत्री भूमी पेडणेकरची उपस्थितीसुद्धा लक्षवेधी ठरली. मराठी कलाकार टिम पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादीच आपल्यासाठी घेऊन आली असून विजेते खालीलप्रमाणे आहेत.

सर्वोत्कृष्ट अभिनेता : अमेय वाघ (मुरांबा)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : सोनाली कुलकर्णी (कच्चा लिंबू)
सर्वोत्कृष्ट चित्रपट : कच्चा लिंबू
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : प्रसाद ओक (कच्चा लिंबू)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : गिरीश कुलकर्णी (फास्टर फेणे)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: चिन्मयी सुमीत (मुरांबा)
सर्वोत्कृष्ट गायिका : अनुराधा कुबेर- माझे तुझे (मुरांबा)
सर्वोत्कृष्ट गायक : आदर्श शिंदे -विठ्ठला (रिंगण)
सर्वोत्कृष्ट नृत्य : फुलवा खामकर- अपने ही रंग में (हंपी)
सर्वोत्कृष्ट कथा : मकरंद मान (रिंगण)

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in News

To Top