Connect with us

मराठी कलाकार

पावसामुळे “ह्या”मराठी मालिकांच वेळापत्रक कोलमडलं.वाचा पूर्ण बातमी.

Television

पावसामुळे “ह्या”मराठी मालिकांच वेळापत्रक कोलमडलं.वाचा पूर्ण बातमी.

पावसाचा फटका जसा सर्व लोकांना बसतो तसाच आता हा फटका मराठी मालिकांनाही बसला आहे. यामुळे मालिकांच्या शूटींगच वेळापत्रक विस्कळीत झालं आहे. काही मालिकांचे शूटींग रद्द करावं लागलं आहे. सलग दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडतं आहे. यामुळे स्थानिक लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

‘झी युवा’ वाहिनीवरील ‘फुलपाखरू’ आणि ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकांच शूटींग पावसामुळे रद्द करण्यात आलं आहे. या दोन्ही मालिकांचे सेट हे घोडबंद येथे आहे. ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेच शूट हे मीरारोड येथे सुरू होत. पण या मालिकेच्या सेटला देखील पावसाने दणका दिला आहे. या मुसळधार पावसामुळे ‘साजणा’ या मालिकेतील कलाकार आणि काही कर्मचाऱ्यांना सेटवर पोहचण्यास उशीर झाल्यामुळे या मालिकेच पॅकअप करण्यात आलं.

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर चारही बाजूला पाणी साचल्यामुळे तूर्तास शूटींग थांबवण्यात आलं आहे. या मालिकेचा सेट हा सावंतवाडीमध्ये आहे. या सेटवर चारही बाजूला पाणी साचलेल्या स्थितीत शूटींग करणं शक्य नसल्यामुळे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments

More in Television

Like Us on Facebook

Popular Posts

To Top