Connect with us

मराठी कलाकार

अभिनेता ह्रिषिकेश जोशी करतोय दिग्दर्शन तर दिवंगत अभिनेत्री रीमा लागूंचा अखेरचा सिनेमा “होम स्वीट होम”.

Movie Trailers

अभिनेता ह्रिषिकेश जोशी करतोय दिग्दर्शन तर दिवंगत अभिनेत्री रीमा लागूंचा अखेरचा सिनेमा “होम स्वीट होम”.

मच अवेटेड आणि मल्टीस्टारर सिनेमा होम स्वीट होमचा ट्रेलर यूट्यूबवर लॉन्च झाला आहे. ह्रिषिकेश जोशी, मोहन जोशी, स्पृहा जोशी, विभावरी देशपांडे, प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी आणि दिवंगत अभिनेत्री रीमा लागू अशी सिनेमाची तगडी स्टारकास्ट आहे. सिनेमाची खासियत म्हणजे दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचा हा शेवटचा सिनेमा असून त्या ह्या सिनेमाद्वारे आपल्याला पुन्हा भेटीस येणार आहे. सिनेमा “फॅमिली ड्रामा” ह्या कटेगिरीतील असून प्रेक्षक सहकुटुंब सिनेमाचा आनंद घेऊ शकतात.

जेष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि रीमा लागू यांची जोडी एकत्र असतांनाची केमिस्ट्री आपण अनुभवली आहे. “होम स्वीट होम” ह्या सिनेमाच्या निमित्ताने रसिकांना पुन्हा सेम केमिस्ट्री अनुभवता येणार आहे. सिनेमाचा ट्रेलर थोडा कभी ख़ुशी कभी गम टाईप असून घराची किंमत साडेतीन कोटी मिळत असल्याने त्याला विकायचं का हा मुद्दा ट्रेलरमध्ये आपल्याला पहायला मिळतो. सिनेमाची आणखी एक विशेष बाब म्हणजे अभिनेता ह्रिषिकेश जोशी ह्या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.
फॅमिली ड्रामाचा तडका देणारा “होम स्वीट होम” येत्या 28 सप्टेंबरपासून प्रदर्शित होत आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Movie Trailers

To Top