Connect with us

मराठी कलाकार

एका स्मार्टफोन मध्ये शूट होतोय”हा”मराठी सिनेमा.वाचा अधिक.

Featured

एका स्मार्टफोन मध्ये शूट होतोय”हा”मराठी सिनेमा.वाचा अधिक.

एक असाही चित्रपट आहे जो मोबाईल मध्ये शूट झाला आहे असं कळलं तर? पण हे शक्य आहे का? मोबाईलमुळे जग खूप जवळ आलं आहे. मात्र, मोबाईलचा किती मोठ्या स्तरावर उपयोग केला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे पाँडीचेरी हा चित्रपट. हो! अगदी खरं! हा संपूर्ण चित्रपट आयफोनवर शूट केला जाणार आहे. १ फेब्रुवारी म्हणजे आजपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. पाँडीचेरी या चित्रपटाचे चित्रीकरण पाँडीचेरीमध्ये करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटाच्या चित्रीकरणाआधीच चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांसमोर आलं आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता वैभव तत्ववादी यांचा वेगळा लूक या पहिल्या पोस्टरमध्ये दिसत आहे. पोस्टरवरील सईचा ब्लॅक एन्ड व्हाइट आणि नो मेकअप लूक सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. दिग्दर्शक सचिन कुंडलकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून, सचिन आणि सई यांची हा एकत्र दूसरा चित्रपट आहे. याआधी सईने सचिन कुंडलकर दिग्दर्शित वजनदार चित्रपटामध्ये काम केले आहे. अभिनेत्री अमृता खानवलकरही या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. अमृताने काही दिवसांपूर्वी पाँडीचेरी चित्रपटातील तिचा लूक सोशल मीडियावर शेअर केला होता.

View this post on Instagram

Finally sharing the news of my first marathi film for the next year @Regrann from @kundalkar – This talented girl joins our film Pondicherry . Our next , to be shot entirely on smartphone . Happy to have you on board Amruta . The casting call thus gets over with three wonderful actors ready to jump into the dynamic process of shooting this film where camera will be almost invisible and the city is the fourth character. सई ताम्हणकर आणि वैभव तत्त्ववादी ह्यांच्यासोबत अमृता खानविलकर “पाँडिचेरी” ह्या चित्रपटात तीसरी महत्वाची भूमिका साकारणार . अमृताचे मनापासून स्वागत . कास्टिंग ची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा आनंद ! @amrutakhanvilkar @saietamhankar @vaibhav.tatwawaadi

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

‘पाँडीचेरी’ चित्रपटातील भूमिका चांगली वठवता यावी, यासाठी सईने १० ते १५ किलो वजनही वाढवले होते. सईचा नो-मेकअप रिएलिस्टिक लूक सईच्या ह्या नव्या भूमिकेविषयी उत्कंठा वाढवणारा आहे. त्यामुळे पाँडीचेरीविषयी सईच्या चाहत्यांना अधिक उत्सुकता लागून राहिली असणार हे नक्की.

Comments

More in Featured

Like Us on Facebook

Popular Posts

To Top