Connect with us

मराठी कलाकार

डॉल्बीवाल्या, आवाज वाढव डीजे, नंतर धमाकेदार मराठी पार्टी सॉन्ग! ‘भावड्या’ फिवर व्हायरल. पहा व्हीडिओ.

Video Songs

डॉल्बीवाल्या, आवाज वाढव डीजे, नंतर धमाकेदार मराठी पार्टी सॉन्ग! ‘भावड्या’ फिवर व्हायरल. पहा व्हीडिओ.

भावड्याची उत्कंठा आता संपली असून तो आता आपल्या सर्वांसमोर आला आहे. भावड्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स चांगल्याच व्हायरल झाल्या होत्या. आणि आता तर चक्क ‘भावड्या’ हे गाणंचं व्हायरल झालं आहे!

महाराष्ट्रातील कोळी समाजात लग्नाच्या आधीचा हळदीचा समारंभ चांगलाच प्रसिद्ध आहे. सर्वच महाराष्ट्रात ह्या समारंभाचं नियोजन कोळी समाजसारखं जोरदार बनवण्याचा प्रयत्न चालतो. सिनेमातील हे गाणं हळदी समारंभाच्या सेलिब्रेशनला तडका लावणारं असून हा भावड्या आगामी मराठी सिनेमा ‘पार्टी’ मधील हळदी सोहळ्याचं सेलिब्रेशन सॉंग आहे.
हे गाणं सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेंनी गायलं असून एका रॉकिंग मराठी पार्टी सॉंगची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. अमितराज ह्यांनी गाणं संगीतबद्ध केलं असून शब्दरचना गुरू ठाकूर यांची आहे. तरुणाईचा राडा, मस्तीची सांगड असलेला पार्टी येत्या 7 सप्टेंबरपासून सिनेमागृहात बघायला मिळणार आहे.

Comments

More in Video Songs

To Top