Connect with us

मराठी कलाकार

दुबईत रंगणार मराठी म्युझिक कॉन्सर्ट.अवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव असतील प्रमुख आकर्षण.

News

दुबईत रंगणार मराठी म्युझिक कॉन्सर्ट.अवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव असतील प्रमुख आकर्षण.

आजवर परदेशामध्ये बॉलिवूडमधील गाण्यांचे अनेक कॉन्सर्ट झाले आहेत. पण आता मराठीतील संगीतकार अवधूत गुप्ते आणि रॅपरकिंग श्रेयस जाधव यांचा म्युझिकल कॉन्सर्ट दुबईमध्ये रंगणार आहे. याच महिन्यात दुबईमध्ये रंगणार असणाऱ्या या कॉन्सर्टचं नाव ‘जल्लोष २०१८’ असं आहे. मराठीतील मैलाचा दगड ठरलेल्या आणि अविस्मरणीय अशा गाण्याचा समावेश असणार आहे. सोबतच या गाण्यांना थोडा ‘फ्युजन टच’ देखील असेल.

गणराज असोसिएट्स, मिराकी इव्हेंट्स आणि मोरया इव्हेंट्स च्या सहयोगाने सादर असणाऱ्या ह्या शोचं सूत्रसंचालन अभिनेत्री स्पृहा जोशी करणार आहे. दुबईमध्ये होणाऱ्या या शोबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून या शोच्या तिकीट बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. हा शो येत्या २१ डिसेंबरला होणार आहे.


अवधूत गुप्ते हे त्याच्या गाण्यांसोबतच ‘झेंडा’, ‘मोरया’ या सारख्या गाजलेल्या चित्रपटासाठी देखील ओळखले जातात. तर दुसरीकडे श्रेयस जाधव हे मराठीतील पहिले रॅपर आहे. रॅपर म्हणून श्रेयस त्यांची अनेक गाजलेली गाणी आहे. पण याशिवाय त्यांची वेगळी ओळख म्हणजे त्यांनी मराठीत अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या दोन दिग्गज गायकांना एकाच स्टेज वर परफॉर्म करताना पाहण्याची अनोखी संधी दुबईकरांना अनुभवायला मिळणार आहे.

Comments

More in News

To Top