Connect with us

मराठी कलाकार

मराठी रॅपर श्रेयश जाधवच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटोज.

Photos

मराठी रॅपर श्रेयश जाधवच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटोज.

‘किंग जे.डी’ उर्फ श्रेयश जाधव किंवा अजून स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर मराठी मधील पहिला रॅपर असलेल्या श्रेयश ने नुकतीच आपली लग्नगाठ बांधली. भाग्यश्री सोमवंशी सोबत त्याचा विवाह संपन्न झाला. या दिमाखदार सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक नामांकित मंडळींनी हजेरी लावून वधूवरास आशीर्वाद दिले. सोशल मीडियावरून देखील या नवीन उभयतांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. श्रेयसने शेयर केलेल्या फोटो वरून हा लग्न सोहळा किती राजशाही आणि भव्य असेल याचा अंदाज येत आहे.

हा सोहळा मुंबई मध्ये पार पडला. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या आणि ‘मी पण सचिन’ या चित्रपटाद्वारे श्रेयसने लेखनात आणि दिग्दर्शनात यशस्वी पाऊल ठेवले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

Comments

More in Photos

To Top