Connect with us

मराठी कलाकार

अबबब! तुमच्या आवडत्या मालिकांचं टीआरपी रेटिंग बघितलेत का?

Television

अबबब! तुमच्या आवडत्या मालिकांचं टीआरपी रेटिंग बघितलेत का?

रोज संध्याकाळी आपल्या घरात मालिका बघणं हा बहुतेकांचा नित्यनियमचं म्हणावा लागेल. त्यात घडणऱ्या रंजक गोष्टी आणि ट्विस्ट नेहमीच कमी जास्त होत राहतात. कदाचित हेच त्यांचं प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यामागचं गमक असावं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोणती मालिका जास्त पाहिली जात आहे तर कोणाची लोकप्रियता घटली हे आपणांस टीआरपी रेटिंगमुळे कळतं. चला तर मग जाणून घेऊयात गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील घराघरांत कोणत्या मालिकेचं वर्चस्व राहिलं ते?

‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका नेहमीप्रमाणे अग्रस्थानी असून राधिका, शनाया आणि गुरुच्या आयुष्यात येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना मालिकेत गुंतवून ठेवण्यात यशस्वी ठरत आहेत. तर सुबोध भावे व गायत्री दातार यांची अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली मालिका ‘तुला पाहते रे’ दुसऱ्या स्थानावर आहे. विक्रांत सरंजामे इशासाठी त्याचं प्रेम व्यक्त करत आहे आणि यामुळेच मालिकेची लोकप्रियता कायम आहे. तिसऱ्या क्रमांकावर ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आहे. शिवाजी महाराजांचं देहावसान, शंभू महाराजांना रायगडापासून दूर ठेवणं, अष्टप्रधान मंडळाचं सुरू झालेलं राजकारण अशा बऱ्याच गोष्टी या आठवड्यात घडल्याने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका चौथ्या स्थानावर आहे. तर पाचव्या स्थानी ‘चला हवा येऊ द्या’ हा रसिकांना दिलखुलास हसवणारा शो आहे.

एकंदरीत सांगायचं झाल्यास टॉप ५ मध्ये झी मराठी वाहिनीच्याच मालिका राज्य करत आहेत.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Television

To Top