Connect with us

मराठी कलाकार

“या”मराठी सिनेमाला दिल्या वरुणने शुभेच्छा.पडला मराठी सिनेमाच्या प्रेमात.

Actor

“या”मराठी सिनेमाला दिल्या वरुणने शुभेच्छा.पडला मराठी सिनेमाच्या प्रेमात.

बॉलिवूडकरांना हल्ली मराठी सिनेमाचं वेड लागत चाललंय. सलमान खान, अजय देवगण, जॉन अब्राहम, नवाजुद्दीन सिद्दीकी अशा एक ना अनेक कलाकार मराठी सिनेमांतून झळकलेले आपण आजवर बघितलेच आहेत. आता या यादीत अजून एका अभिनेत्याची भर पडलीय तो अभिनेता वरूण धवनची.

आगामी ‘लोकल-व्हाया-दादर’ या दिग्दर्शक नितीन रोकडे यांच्या चित्रपटाचा टीझर पोस्टर सोशल मीडियावर नुकताच लाँच करण्यात आला. नुकतेच वरूण धवनने ‘लोकल-व्हाया-दादर’ सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत दिग्दर्शक नितीन रोकडे आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. इतर बॉलिवूड कलाकारांप्रमाणे वरूण धवनची या निमित्ताने मराठीत एंट्री होणार असल्याची शक्यता असल्याचे स्पष्ट होते. खुद्द वरूण धवन सिनेमाच्या प्रमोशन करताना दिसतोय. त्यामुळे सिनेमात वरूण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

चित्रपटाची कथा-पटकथा नितीन रोकडे यांची असून अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटाचे संकलन करणा-या नितीन रोकडे यांनी यापूर्वा ‘तालीम’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. चित्रपटाचे संवाद सायली केदार यांचे असून फारूख खान छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडणार आहेत. ‘लोकल-व्हाया-दादर’ या चित्रपटामध्ये एक निरागस प्रेमकथा पाहायला मिळणार असून कोणकोणत्या कलाकाराच्या भूमिका असणार हे ही गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे.

Comments

More in Actor

To Top