Connect with us

मराठी कलाकार

‘वर्तुळ’ मालिकेतील शाही विवाहसोहळ्याचे एक्सक्लुजिव्ह फोटोज.

Television

‘वर्तुळ’ मालिकेतील शाही विवाहसोहळ्याचे एक्सक्लुजिव्ह फोटोज.

जुई गडकरी बऱ्याच काळानंतर झी युवा वरील ‘वर्तुळ’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आली. विकास पाटील , विजय आंदळकर आणि जुही गडकरी यांच्या अभिनयाने सजलेली ही मालिका एक फॅमेली सस्पेन्स स्टोरी आहे. मालिकेचं कथानक अगदी रंजक असून, ही कथा मीनाक्षी नावाच्या एका अनाथ मुलीची आहे जिचा भूतकाळ तिच्या भविष्यकाळात डोकावतोय. मीनाक्षीने तिच्या भूतकाळातील काही गोष्टी तिच्या मनात दडवून ठेवल्या होत्या, मात्र आता तिने तीचं आयुष्य मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून अभिजीत ला पाठवले आहे. पण अजूनही अभिजीत ने तो ऑडिओ ऐकला नाही आहे. या लग्नात काही भयंकर घडेल का ? तिचा भूतकाळ तिच्यासमोर येईल का ? अभिजीत सोबत निर्माण झालेल्या विश्वासाच्या नात्याला मिनाक्षीच्या भूतकाळाने तडा जाणार का? त्यांचं नातं टिकून राहणार का? असे असंख्य प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या मनात उठत आहेत.

मिनाक्षी आणि अभिजितची भेट अपघाताने होते. अभिजित मीनाक्षीला स्वतःच्या घरी घेऊन जातो. कालांतरानें त्या दोघांमध्ये प्रेम होते आणि आता येत्या रविवारी १० फेब्रुवारीला रात्री ९ वाजता वर्तुळ या मालिकेचा महा एपिसोड दाखवला जाणार आहे. यात मीनाक्षी आणि अभिजीत चे लग्न मोठ्या थाटामाटामध्ये घडणार आहे. पहा त्याचे एक्सक्लुजिव्ह फोटोज.

Comments

More in Television

To Top