Connect with us

मराठी कलाकार

‘हा’ अभिनेता देतोय अभिनेत्री सैयामीला ग्रामीण मराठीचे धडे.बिहाईंड द सीन्स माऊली!

Actress

‘हा’ अभिनेता देतोय अभिनेत्री सैयामीला ग्रामीण मराठीचे धडे.बिहाईंड द सीन्स माऊली!

मिर्ज़ियाँ या ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित सिनेमातून अभिनेत्री सैयामी खेर ने हिंदी चित्रपटसृष्टित धमाकेदार पदार्पण केले होते. ह्या चित्रपटानंतर ही हुन्नरी अभिनेत्री रितेश देशमुखच्या आगामी मराठी चित्रपट “माऊली” मधून मराठी चित्रपटसृष्टित पदार्पणास सज्ज झाली आहे. या सिनेमात सैयामी लय भारी अभिनेता रितेश देशमुखसह स्क्रीन शेअर करणार आहे. सिनेमात सैयामीचा गावरान अंदाज पाहायला मिळणार आहे. सैयामी गावातल्या तरूणीची भूमिका साकारत असून यासाठी तीने बरीच मेहनत घेतली आहे.

सैयामी उत्तम मराठी बोलते. मात्र ही भूमिका साकारण्यासाठी तिला ग्रामीण ट्युनिंग आणि उच्चारही तसे हवे होते. यासाठी सैयामीच्या मदतीसाठी धावून आला अभिनेता सिद्धार्थ जाधव. माऊली सिनेमात सिद्धार्थसुद्धा विशेष भूमिका साकारत आहे. त्यामुळे सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान सिद्धू आणि सैयामीची चांगलीच गट्टी जमली. जेव्हा जेव्हा सेटवर दोघांना मोकळा वेळ मिळाला त्यावेळी दोघं गप्पा मारता मारता भाषा आणि सिनेमातील गावरान उच्चाराच्या संवादावर अधिक काम करू लागले. सिद्धार्थने तिला यातील लहानसहान गोष्टी समजावून सांगितल्या आणि सैयामीनेही त्या समजावून घेत अंमलात आणल्या.

एक रंजक गोष्ट म्हणजे अभिनेत्री तन्वी आझमी या सैयामीच्या आत्या आहेत आणि त्यांनी रितेशसोबत लय भारी मराठी सिनेमात काम केलं आहे. त्यामध्ये त्यांनी रितेशच्या आईची भूमिका वठवली होती. अभिनयाचा घरातून मिळालेला वारसा, सहकलाकारांची मदत आणि स्वतःची मेहनत यामुळे माऊली सिनेमातील सैयामीची भूमिका रसिकांना नक्कीच आवडेल.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Actress

To Top