Connect with us

मराठी कलाकार

“वेडींगचा शिनेमा”तील नवं गाणं प्रदर्शित.”माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हा”.

Video Songs

“वेडींगचा शिनेमा”तील नवं गाणं प्रदर्शित.”माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हा”.

“माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं…कुणी जेवाल्यावाचून नाही जायचं हं….” हे बोल आहेत वेडिंगचा सिनेमा या चित्रपटातील एका गाण्याचे. नुकतंच या चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. डॉ सलील कुलकर्णी यांचा मुलगा शुभंकरने हे गाणं गायलं आहे. या आधी शुभंकरने ‘चिंटू’ या मराठी चित्रपटात पहिलं गाणं गायलं होतं. ‘वेडिंगचा शिनेमा’मधील या गाण्यात त्याला आर्या आंबेकर आणि प्रसेनजीत कोसंबी यांनी साथ दिली आहे.

संगीत दिग्दर्शक डॉ सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला वहिला चित्रपट म्हणजे ‘वेडिंगचा शिनेमा’. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर या चित्रपटाची गाणी संदीप खरे यांनी लिहिली आहेत. ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, आलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तराडे, संकर्षण कऱ्हाडे,प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या आघाडीच्या कलाकारांच्या भूमिका आहेत, शिवराज वायचळ आणि रूचा इनामदार ही नवोदित जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. त्यामुळे या चित्रपटाची आणखी उत्सुकता वाढली आहे.

याआधी प्रकाशित करण्यात आलेल्या याधीच्या दोन्ही गाण्यांना आणि टीझरला रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटाची कथा सलील कुलकर्णी यांनी लिहिली आहे. सलील कुलकर्णी यांनी कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहे, याचीही प्रचिती प्रेक्षकांना हा चित्रपट देईल. बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये हे बरेचशे पैलू भरपूर मनोरंजनाच्या मसाल्यासह प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाचा एक टीझर नुकताच प्रदर्शित झाला होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. हा चित्रपट १२ एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.

Comments

More in Video Songs

Like Us on Facebook

Popular Posts

To Top