Connect with us

मराठी कलाकार

“माझ्या नवऱ्याची बायको”मालिकेला रंजक वळण.टिआरपीच्या शर्यतीत नंबर एक.

Television

“माझ्या नवऱ्याची बायको”मालिकेला रंजक वळण.टिआरपीच्या शर्यतीत नंबर एक.

टिआरपीच्या शर्यतीत नेहमीची घसरण आपल्याला बघायला मिळते. काही दिवसांपूर्वी नंबर एकवर असणारी “तुला पाहते रे”मालिकेला सध्या झी मराठीच्याच एका मालिकेने मागे टाकले असून एव्हाना त्या मालिकेचं नाव तुम्ही ओळखलंही असेल. हो अगदी बरोब्बर अंदाज बांधलाय तुम्ही आम्ही बोलतोय ते ‘माझ्या नवऱ्याची बायको’मालिकेबद्दल! ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका पुन्हा एकदा टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आली आहे. या मालिकेला सध्या वेगळे वळण लागले असून प्रेक्षकांच्या मनात मालिकेप्रती प्रचंड आकर्षण निर्माण झाले आहे.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेचा नुकताच प्रसारीत झालेल्या भागात राधिका शेतकऱ्यांना मदत निधी देण्यासाठी पत्रकार परीषदेत जाते. शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी जेव्हा ती सुटकेस खोलते तेव्हा त्यात पैशांऐवजी दगडी सापडतात. राधिका शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावलेली असताना तिच्यावरच पैसे चोरल्याचा आरोप होतो. त्याच्यानंतर राधिकावर उलटसुलट चर्चा होते. दरम्यान राधिकाचा नवरा गुरूनाथ सुभेदारला खूप आनंद होतो आणि तो सर्वांसमोर राधिकाचा अपमान करण्यात यशस्वी होतो. पण दुसरीकडे राधिकाला धक्का बसतो आणि पैसे गेले कुठे याचा विचार करू लागते.

राधिकाच्या ऑफिसमध्ये शेतकरी राधिकावर पैसे चोरल्याचा आरोप करू लागतात आणि बरीच टीका करू लागतात. हे सगळे ऐकून राधिकाला रडू कोसळते. पानवलकर हा सगळा आरोप स्वतःवर घेत सांगतात की ही माझी चूक आहे की मी पैसे नीट ठेवले नाही. परंतु, शेतकरी राधिकालाच दोषी ठरवतात व तिला कोर्टात घेऊन जाणार असल्याचे सांगतात. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला लोकांनी डोक्यावर घेतले. अभिजीत खांडकेकर आणि अनिता दाते या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. यासोबतच शनाया ही मालिकेच्या केंद्रस्थानी असलेली भूमिका रसिका सुनील साकारत होती. मात्र रसिकाने नुकतेच काही महिन्यांपूर्वी मालिकेला रामराम ठोकला. त्यामुळे तिच्या जागेवर इशा केसकरने ही भूमिका साकारली. रसिकाने मालिका सोडल्यानंतर टीआरपीमध्ये मालिका मार खाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, टीआरपी कमी होण्याऐवजी वाढत जात आहे.

Comments

More in Television

To Top