Connect with us

मराठी कलाकार

मेघा धाडे पहिली मराठी बिगबॉस विजेती. अठरा लाख रुपये बक्षीस मिळणार!

Television

मेघा धाडे पहिली मराठी बिगबॉस विजेती. अठरा लाख रुपये बक्षीस मिळणार!

बिगबॉस! उत्सुकता!!आणि शेवटच्या लढाईची धकधक!!! आज बिगबॉसचा सीझन पहिला संपला आणि ह्या सिझनची विजेती ठरली ती मेघा धाडे. घरात आल्याच्या सुरुवातीपासूनच मेघाच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. मी ह्या घरात आलीये ते हा खेळ जिंकण्यासाठीच हे तिने तेव्हाच जाहीर केले होते. आणि मेघाचा घरातील प्रवास बघितला तर तो देखील विजेत्याला साजेशाप्रमाणेच राहिला. त्यामुळे ह्या सिझनची विनर ठरलेल्या मेघाला अठरा लाखांचं रोख बक्षीस आणि एक आलिशान घर मिळणार आहे. पुष्कर जोग ह्या सिझनचा उपविजेता ठरला.

15 एप्रिल रोजी हा शो सर्वप्रथम सुरु झाला त्यावेळी घरात एकूण 15 सदस्य होते. पुढे वाईल्ड कार्ड एंट्री द्वारे 3 सदस्य घरात आले. अशा एकूण अठरा सदस्यांमध्ये सरस ठरत बिगबॉसचा मुकुट मेघाने मिळवला आहे. घरात तिच्यासमवेत आस्ताद काळे, पुष्कर जोग, उषा नाडकर्णी, सुशांत शेलार अशी एक ना अनेक मोठी मोठी नावं स्पर्धेत होती. मेघांच करिअर बघायचं झालं तर उर्वरित मंडळी तिला बरीच सिनिअर होती. पण तरीही त्या सर्वांना बाजूला सारत मेघाने हा सीझन जिकण्याचा पराक्रम केला आहे त्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. घराच्या बाहेरची गोष्ट करायची झाल्यास फॅन्सचाही सपोर्ट पूर्ण मेघाच्या बाजूनेच दिसत होता.

मेघासोबत इतर असलेल्या सदस्यांचही तेवढंच कौतुक होत आहे. बिगबॉस म्हटलं म्हणजे भांडण, वाद, प्रेम, फ्लर्टींग ह्या गोष्टी आल्याच. आणि मराठी बिगबॉसमध्ये आपल्याला सुद्धा हा मसाला बघता आला. शो चे होस्ट महेश मांजरेकर देखील फॅन्सना तितकेच भावून गेले. त्यांचं सूत्रसंचालन सर्वांनाच पसंतीसआलं होतं. विकेंडच्या डाव मध्ये आपल्याला ते प्रत्येक सदस्याला त्याच्या चूका बिनधास्तपणे दाखवत असल्याचंही आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे ते सुद्धा प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत.

Bigg Boss Marathi Teaser Released

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Television

To Top