Connect with us

मराठी कलाकार

मराठी ‘बिग बॉस’ विजेती मेघा धाडेची हिंदी ‘बिग बॉस’च्या घरात वाईल्डकार्ड एन्ट्री!

Television

मराठी ‘बिग बॉस’ विजेती मेघा धाडेची हिंदी ‘बिग बॉस’च्या घरात वाईल्डकार्ड एन्ट्री!

बिगबॉसच्या चाहत्यांसाठी आलेली एक नवी खुशखबर म्हणजे लवकरच ‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे आता ‘बिग बॉस’ हिंदीच्या १२ व्या पर्वात झळकणार आहे. मेघाने ‘बिग बॉस’ मराठीचं पहिलं पर्व चांगलंच गाजवलं होतं. पहिल्या दिवसापासून चांगला खेळ खेळत रेशम, पुष्कर, सई अशा विजेच्या पदाच्या प्रमुख दावेदारांना मात देत तिनं ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाचा किताब पटकावला होता.

सध्या ‘बिग बॉस’ हिंदीचा १२ वा सिझन या ना त्या कारणानं चर्चेत आहे. त्यात आता वेळ आली आहे ती वाईल्ड कार्ड एन्ट्रीची. सुरुवातीस वाईल्ड कार्ड एन्ट्रीसाठी तनुश्री दत्ताचं नाव चर्चेत होतं. मात्र आता वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे मराठी अभिनेत्री मेघा धाडे घरात प्रवेश करणार आहे हे ऐकून सर्वच स्पर्धकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हिंदी ‘बिग बॉस’च्या विजेती पदाची प्रमुख दावेदार मानली जात असणारी नेहा पेंडसे गेल्याच आठवड्यात‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडली. तिच्या जाण्यानंतर मराठी प्रेक्षकांच शो कडे आकर्षण कायम ठेवण्यासाठी ‘बिग बॉस’नं मेघाला संधी दिल्याची चर्चा आहे.

आता शेवटपर्यंत या घरात तग धरून राहण्यास मेघा यशस्वी होते का? हे पाहणं औत्सुक्याचं होणार आहे.

 

Comments
Continue Reading
Advertisement

More in Television

To Top