Connect with us

मराठी कलाकार

सासूपेक्षाही २वर्षांनी मोठा आहे “हा”अभिनेता.वाचा अधिक.

News

सासूपेक्षाही २वर्षांनी मोठा आहे “हा”अभिनेता.वाचा अधिक.

अ‍ॅक्टर म्हणा कि मॉडेल म्हणा अथवा फिटनेस फ्रीक सर्वांची नजर वेधून घेण्यात कमी पडेल तो मिलिंद सोमण कसला? गेल्या वर्षी मिलिंद सोमणने गर्लफ्रेन्ड अंकितासोबत लग्नगाठ बांधली. या लग्नाची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. कारण लग्नाच्यावेळी मिलिंद हा ५२ वर्षांचा होता तर अंकिताचे वय २७ वर्षं होते. दोघांमध्ये २५ वर्षांचा फरक असूनही दोघे रेशीमगाठीत अडकले. २००६ मध्ये मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मेलिन जंपानोई हिच्याशी लग्न केले असून अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे.

नुकत्याच एका मुलाखतीत मिलिंदने ही गोष्ट सांगितल्यानंतर आपल्या आईच्या आणि मिलिंदच्या वयाच्या अंतराबद्दल अंकिताने लगेचच खुलासा केला. ती म्हणाली, त्यांच्यात फक्त दोन वर्षांचे अंतर आहे. माझ्या आईला मिलिंदची पर्सनॅलिटी प्रचंड आवडत होती. पण ती आमच्या नात्याबद्दल थोडी घाबरलेली होती. तुम्ही तुमच्या नात्याबद्दल गंभीर आहात का असे तिने मला विचारले होते. माझ्या आयुष्यात कोणतरी आहे आणि मला माझे आयुष्य त्याच्यासोबतच व्यतीत करायचे आहे. मी त्याच्यासोबत लग्न करेन अथवा नाही करणार… पण मी त्याच्यासोबतच राहाणार असे मी ठामपणे घरी सांगितले होते. त्यावर माझा विचार कधीतरी बदलेल असे माझ्या पालकांचे म्हणणे होते.

मिलिंद आणि अंकिताच्या लग्नाला एप्रिल महिन्यात एक वर्षं झाले. मिलिंदने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या लग्नासंबंधित अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. अंकिताच्या घरात मिलिंद आणि तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळल्यानंतर सुरुवातीला त्यांनी विरोध केला होता असे देखील त्याने सांगितले. एवढेच नव्हे तर त्याची सासू त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असल्याचे देखील या मुलाखतीद्वारे सगळ्यांना कळले आहे. द टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने सांगितले की, मिलिंद आणि माझ्या नात्याविषयी मीच घरातल्यांना सांगितले होते. हे कळल्यानंतर आईला चांगलाच धक्का बसला होता. त्यावर लगेचच मिलिंदने सांगितले की, अंकिताची आई माझ्यापेक्षा लहान आहे.

Comments
Continue Reading

More in News

Like Us on Facebook

Popular Posts

To Top