Connect with us

मराठी कलाकार

सस्पेन्स आणि रहस्यमयी “मिरांडा हाऊस”चा टिझर.

Movie Teaser

सस्पेन्स आणि रहस्यमयी “मिरांडा हाऊस”चा टिझर.

सध्या मराठी चित्रपटामध्ये खूप चांगले प्रयोग होत आहेत. आणि मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर अनेक चांगले चित्रपट येत आहेत. अशाच एका वेगळ्या विषयावर आधारित ‘मिरांडा हाऊस’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रसिद्ध दिगदर्शक राजेंद्र तलक यांनी दिग्दर्शित केला असून इरिस प्रॉडक्शन हाऊसने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

चित्रपटाचा टिझर पाहिला तर टिझरमध्ये पल्लवी सुभाष आणि साईंकित कामत बंदूक ताणून उभे आहेत. तर दुसऱ्या दृश्यात पल्लवी सुभाष कोणाच्यातरी मिठीत दिसत आहे. ही दोन विरोधी दृशे पाहिल्यावर चित्रपट नक्की कशावर आधारित आहेत, याचा अंदाज येत नाही. मात्र हा चित्रपट नक्कीच वेगळा, मनोरंजक आणि रहस्यमय असणार आहे हे नक्कीचं. या चित्रपटात मिलिंद गुणाजी, पल्लवी सुभाष, साईंकित कामत हे त्रिकुट दिसणार आहे. ‘मिरांडा हाऊस’ या चित्रपटाच्या निमित्ताने राजेंद्र तलक पुन्हा नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
अनेक रहस्यमय चित्रपट याआधी देखील प्रदर्शित झाले आहेत. पण ‘मिरांडा हाऊस’ हा चित्रपट या सगळ्यामध्ये नक्की वेगळा असेल यात शंकाचं नाही. शिवाय अनेक दिवसांनी पल्लवी सुभाष, मिलिंद गुणाजी मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. इरिस प्रॉडक्शन हाऊसने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राजेंद्र तलक यांनी याआधी ‘अ रेनी डे’, ‘सावरिया. कॉम’, ‘सावली’ हे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिग्दर्शित केले असून ‘मिरांडा हाऊस’ हा चित्रपट येत्या १९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

Comments
Continue Reading
You may also like...

More in Movie Teaser

Like Us on Facebook

Popular Posts

To Top