Connect with us

मराठी कलाकार

मिस अर्थ इंडिया करतेय मराठी सिनेमातून पदार्पण। ‘आस’ अपकमिंग सिनेमा

Hemal Ingle

Actress

मिस अर्थ इंडिया करतेय मराठी सिनेमातून पदार्पण। ‘आस’ अपकमिंग सिनेमा

मिस अर्थ इंडिया-फायर हा किताब मिळवणारी महाराष्ट्राची लेक हेमल इंगळे. २०१६ साली तिने हा पुरस्कार मिळवला होता. तीच हेमल आता मराठी चित्रसृष्टीत पदार्पण करतेय म्हणे! हो हो अगदी खरं! हेमल आगामी ‘आस’ ह्या मराठी सिनेमातून अभिनय क्षेत्रात उतरते आहे.

मनोज विशे हे ह्या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. हेमल म्हणजे बुद्धिमत्तेसोबत सुंदरता अशीच आहे असं दिग्दर्शकांना वाटतंय म्हणून ते म्हणतात तिचा हा पहिला चित्रपट जरी असला तरी तिला जास्त प्रोब्लम येणार नाही. स्वर्णफ क्रिएशन्स प्रस्तुत हेमल इंगळे स्टारर हा ‘आस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Hemal Ingle

आजवर बघायला गेलं तर सौंदर्य क्षेत्रातील स्पर्धा जिंकलेल्या बहुतांशी स्त्रियांनी पुढे अभिनय हे क्षेत्र निवडलं आहे. ऐश्वर्या रॉय बच्चन, लारा दत्ता  भूपाठी, प्रियांका चोप्रा ह्या सगळ्यांनीच हा पायंडा कायम ठेवलेला आहे. ह्यात एक नवीन भर म्हणून आता हेमल इंगळेचं नाव ह्या यादीत जमा होतंय. हेमल मुळची महाराष्ट्राची कन्या असून कोल्हापुरात वाढलेली आहे.

Hemal Ingle

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Actress

To Top