Connect with us

मराठी कलाकार

का व्हायरल होतोय मिथिला पालकरचा “निरमा गर्ल”फोटो?वाचा अधिक.

Actress

का व्हायरल होतोय मिथिला पालकरचा “निरमा गर्ल”फोटो?वाचा अधिक.

करिअरच्या सुरुवातीला कप सॉंग व्हीडीओजमुळे तुफ्फान व्हायरल झालेली, ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर. मिथिला नेहमी तिच्या भूमिकांमुळे चर्चेत येते. नुकतीच ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती निरमा साबणावरील निरमा गर्ल सारख्या गेटअपमध्ये पहायला मिळते आहे.

कारवां या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली होती. ‘गर्ल इन द सिटी’ आणि ‘लिटील थिंग्स’ या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाऊ लागली. मिथिला पालकरने ‘निरमा गर्ल’च्या गेटअपमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून लिहिले की, “लोकप्रिय निरमा वॉशिंग पावडरची आठवण करून देताना आम्हाला आनंद होतोय.” नेटफ्लिक्सवरील आगामी सिनेमा ‘चोपस्टिक’मध्ये मिथिला झळकणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

मिथिला अभिनेता अभय देओलसोबत या सिनेमात झळकणार असून या सिनेमााची कथा मुंबई शहराशी निगडीत असून मिथिला आणि अभय चोरी झालेल्या कारचे प्रकरण सोडवताना पहायला मिळत आहेत. या सिनेमात मिथिला निरमाच्या भूमिकेत दिसणार आहे. जी चीनी यात्रीकरूंना मार्गदर्शन करताना दिसणार आहे. निरमा ही डरपोक मुलगी आहे. जेव्हा तिची नवीन कार चोरीला जाते. त्यावेळी ती खूप त्रस्त होते. त्यावेळी अभय देओल तिची कार शोधून देण्यासाठी मदत करतो. ती कार शोधण्यासाठी ते आपल्या प्रवासात बकरीसोबत टीम बनवतात. त्यांना ती कार मिळते की नाही, हे पाहण्यासाठी हा सिनेमा पहावा लागेल.

Comments

More in Actress

To Top