Connect with us

मराठी कलाकार

अभिनेत्री मिथिला पालकरच्या घायाळ अदा. पहा साडीतील लेटेस्ट फोटोशूट.

Photos

अभिनेत्री मिथिला पालकरच्या घायाळ अदा. पहा साडीतील लेटेस्ट फोटोशूट.

करिअरच्या सुरुवातीस अभिनेत्री मिथीला पालकर कप साँगमुळे अल्पवधीतच साऱ्यांची लाडकी बनली होती. तिने वेबविश्वात अक्षरक्षा धुमाकूळ घातला होता. आपल्या आनंदी चेहऱ्यासोबतच एक उत्स्फूर्त आणि उत्तम अभिनेत्री असल्याचं अभिनेत्री मिथीला पालकरने आता सिद्ध केलं आहे. स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग असलेल्या मिथिलाचा ड्रेसिंग सेन्सही अगदी उत्तम आहे. नुकतंच तिने स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून फोटोत तिने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. तिचा हा साडीतील लूक नेटिझन्सना सध्या बराच आवडलेला बघायला मिळत आहे.

मुरांबा या आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमात तिने दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं.आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान मिळवणाऱ्या मिथीलाने काही दिवसांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीतही पाऊल ठेवलं. ‘कारवाँ’ या सिनेमातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या अभिनयाचेही सर्वत्र कौतुक झाले होते.

Comments

More in Photos

To Top