Connect with us

मराठी कलाकार

कुठल्या सेटवर नाही तर,खऱ्याखुऱ्या वस्तीत शूट होतेय ‘मोलकरीण बाई’.

Television

कुठल्या सेटवर नाही तर,खऱ्याखुऱ्या वस्तीत शूट होतेय ‘मोलकरीण बाई’.

‘स्टार प्रवाह’वर हल्ली ‘मोलकरीण बाई’ मालिका चांगलीच लोकप्रिय होत आहे. या मालिकेविषयी आज एक अशी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हि तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित व्हाल. मालिका म्हंटलं की डोळे दिपवणारे सेट्स, भरजरी साड्या आणि कलाकुसरीचे दागिने हे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. पण, ‘मोलकरीण बाई’ मालिकेसाठी मात्र कोणताही सेट उभारण्यात आला नाही. ठाण्यातल्या खऱ्याखुऱ्या वस्तीमध्ये सध्या या मालिकेचं शूटिंग सुरु आहे. ठाण्यातल्या मणीबाग वस्तीमध्ये सध्या या मालिकेचं शूटिंग सुरु आहे. या वस्तीत राहणाऱ्या रहिवाश्यांच्या घरात सध्या लाईट्स, कॅमेरा आणि एक्शनचा आवाज सध्या घुमतोय.

उषा नाडकर्णी, भार्गवी चिरमुले, सारिका निलाटकर, सुप्रिया पाठारे, अश्विनी कासार, गायत्री सोहम अशी स्टारकास्ट या मालिकेत आहे. “सेट उभा करण्यापेक्षा आम्हाला प्रत्यक्ष घटनास्थळ हवं होतं. सीनमध्ये अधिकाधिक जिवंतपणा आणण्यासाठी आम्ही खऱ्या वस्तीमध्ये शूटिंग करण्याचा निर्णय घेतला. वस्तीमधल्या लोकांसाठी शूटिंग आणि कॅमेरा या गोष्टी सुरुवातीला नव्या होत्या. पण आता त्यांना याची सवय झालीय. त्यांच्याकडूनही खुप चांगलं सहकार्य आम्हाला मिळतंय.”असं या मालिकेचे दिग्दर्शक वैभव चिंचाळकर सांगतात.

मालिकेचा विषय आणि त्याची मांडणी याचा विचार करता ‘स्टार प्रवाह’ वाहिनी आणि मालिकेच्या संपूर्ण टीमने रिअल लोकेशनवर शूट करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. कलाकारांप्रमाणेच या वस्तीतले रहिवाशीही कलाकारांच्या भूमिकेत शिरले आहेत. अत्यंत नियोजनपूर्वक या मालिकेचं शूटिंग पार पडतंय. शूटिंगचा कोणालाही त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली जातेय. यासाठी मालिकेची संपूर्ण टीम झटतेय.

Comments
Continue Reading
You may also like...

More in Television

To Top