Connect with us

मराठी कलाकार

एक वेगळी भूमिका साकारतेय मृन्मयी। निमित्त आगामी शिकारी सिनेमाचं

News

एक वेगळी भूमिका साकारतेय मृन्मयी। निमित्त आगामी शिकारी सिनेमाचं

मोठी उत्कंठा, चर्चा आणि गाजावाजा झाल्यानंतर महेश मांजरेकर आणि विजू माने ह्यांचा आगामी शिकारी 20 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. सिनेमात बरेच आघाडीचे कलाकार असून आणखी एक विशेष बाब म्हणजे शिकारीचं सरप्राईज पॅकेज म्हणून मृन्मयी देशपांडे आपल्याला सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेसृष्टीतील गुणी अभिनेत्री जेव्हा मनोरंजनात्मक सिनेमात आपलं नाणं खणखणीत वाजवतात तेव्हा तो अनुभव बघण्यालायक असतो, आणि मृन्मयी सिनेमात तो अनुभव प्रेक्षकांना देऊन जाते असं दिग्दर्शक विजू माने म्हणाले. महेश मांजरेकर आणि विजू माने ह्यांच्यामुळेच मी या सिनेमात आले. महेश मांजरेकर सरांनी जेव्हा मला ह्या रोलबाबत विचारलं तेव्हा मी त्यांना नाही म्हणू शकली नाही असं मृन्मयी देशपांडेने ह्यावेळी बोलतांना सांगितलं.

यावर सविस्तृत बोलतांना ती म्हणाली कि आजवर पडद्यावर केलेल्या भूमिकेपैकी हि सर्वात वेगळी भूमिका आहे. वेगळेपण असल्यामुळे आपण हि भूमिका केल्याचंही ती म्हणाली. आजवर मृन्मयीच्या गाजलेल्या भूमिका पहिल्या तर त्या सर्व सोज्वळ आणि शहरी प्रकारातील होत्या. शिकारीमधील तिचा रोल तिला सांगताना होकाराविषयी थोडा साशंक होतो. बुद्धिजीवी व्यक्तिरेखा साकारल्यानंतर एका उनाड भूमिकेत काम करणं जिकरीचं होतं. परंतु साचेबद्धपणे काम करणं पसंत नसल्याने तिने ह्या भूमिकेत जीव ओतला आहे असं दिग्दर्शक विजू माने यांनी सांगितले. उर्वरित स्टारकास्ट पाहता सर्व दिग्गज कलाकार आपल्याला सिनेमांत पाहायला मिळणार आहेत. नेहा खान आणि सुव्रत जोशी या दोघांची मध्यवर्ती भूमिका सिनेमांत आहे.

Comments
Continue Reading
Advertisement

More in News

To Top