Connect with us

मराठी कलाकार

मुक्ता बर्वे झळकतेय डॅशिंग लूक मध्ये.पहा ‘बंदिशाळा’सिनेमाचा मोशन पोस्टर.

Upcoming Movies

मुक्ता बर्वे झळकतेय डॅशिंग लूक मध्ये.पहा ‘बंदिशाळा’सिनेमाचा मोशन पोस्टर.

‘बंदिशाळा’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर व्हिडीओ नुकताच अभिनेत्री मुक्ता बर्वेने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘बंदिशाळा’ या चित्रपटात मुक्ता एका धडाकेबाज पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ चित्रपटानंतर मुक्ताचा कोणता आगामी चित्रपट येणार याची चर्चा मुक्ता बर्वेंच्या फॅन्समध्ये दिसत होती. त्यानंतर मुक्ता बर्वे कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम करते आहे, हे जाणून घेण्यासाठी तिचे फॅन्स उत्सुक होते. मात्र आता फॅन्सची उत्सुकता संपली आहे.

‘बंदिशाळा’ या चित्रपटामधून मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एका धडाकेबाज पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत या चित्रपटात मुक्ता दिसणार आहे. तिच्या या डॅशिंग लूक मध्ये ती गुंडांशी लढत देतांना दिसत आहे. त्यामुळे अशा डॅशिंग अंदाजात मुक्ताला पाहणे कमालीचे वाटणार आहे. ‘बंदिशाळा’ या चित्रपटाचे शीर्षक व मुक्ताचा एकंदर लूक पाहिल्यानंतर हा चित्रपट कारागृहावर बेतलेला असेल असे दिसत आहे.

‘मुंबई-पुणे-मुंबई’ या चित्रपटातील अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे या गोड जोडीचे प्रेक्षकांनी मनापासून स्वागत केले होते. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वेचा ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला. मात्र चाहत्यांना तिच्या ह्या सिनेमासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे, कारण ‘बंदिशाळा’ हा चित्रपट १० मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

Comments

More in Upcoming Movies

Like Us on Facebook

Popular Posts

To Top