Connect with us

मराठी कलाकार

चहाच्या वाफेसोबत प्रेमाची उकळी. मुळशी पॅटर्न सिनेमातील ‘उन उन’ गाण्यात रोमँटिक केमिस्ट्री.

Upcoming Movies

चहाच्या वाफेसोबत प्रेमाची उकळी. मुळशी पॅटर्न सिनेमातील ‘उन उन’ गाण्यात रोमँटिक केमिस्ट्री.

वाफाळलेला कडक चहा आणि प्रेमाचा संगम कधी एकत्र अनुभवलाय? ऐकायला थोडं विचित्र वाटतं ना? पण प्रवीण तरडे लिखित, दिग्दर्शित आगामी ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात चहाभोवती फिरणारी प्रेमी युगुलाची हटके अशी केमिस्ट्री ‘उन उन’ या गाण्यात बघायला मिळते आहे. अभिजित भोसले जेन्युईन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता ओम भूतकर मुख्य भूमिकेत आहे, तर मालविका गायकवाड अभिनयात पदार्पण करत आहे. याच फ्रेश जोडीवर ‘उन उन’ हे अतिशय सुंदर असे रोमँटिक गाणे चित्रित करण्यात आले आहे.

वैशाली माडे आणि अवधूत गुप्ते यांच्या आवाजाचा साज चढलेल्या ‘उन उन’ गाण्याचे गीतकार प्रणित कुलकर्णी आहेत. तर नरेंद्र भिडे यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. ‘उन उन व्हटातून गुलाबी धांदल, वाफाळल्या पीरमाची मोगरी मलमल’’ असे शब्द असलेल्या गाण्यातून चहाच्या वाफेसोबत दोघांच्याही मनातील प्रेमाला उकळी फुटलेली दिसते. चहासारख्या रोजच्या जगण्यातील पेयाला प्रेमाच्या नजरेतून बघण्याचा हा पहिलाच प्रयोग म्हणावा लागेल. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण तरडे यांचे आहे. अतिशय वेगळ्या कथेचा आशय असलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट येत्या २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

Comments

More in Upcoming Movies

To Top