Connect with us

मराठी कलाकार

‘चॉकलेट बॉय’ची इमेज पुसणार आहे ‘हा’ अभिनेता.आगामी मराठी सिनेमा’मुंबई आपली आहे’.

Upcoming Movies

‘चॉकलेट बॉय’ची इमेज पुसणार आहे ‘हा’ अभिनेता.आगामी मराठी सिनेमा’मुंबई आपली आहे’.

मराठी चित्रपटात आधी कधीही न दिसलेला असा थरार ‘मुंबई आपली आहे’ या चित्रपटातुन प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. १९९३ साली मुंबईमध्ये जी गुन्हेगारी होती त्यावरच आधारित आणि तत्कालीन मुंबईची चाळ संस्कृती आणि त्यातून फुलत जाणारी प्रेमकथा या चित्रपटाद्वारे आपल्याला पाहायला मिळेल. हिंदी आणि मराठी मध्ये आपल्या अभिनयचाही छाप पडणारा राकेश बापट हा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका निभावत आहे. रोमँटिक हिरो ची प्रतिमा असलेला राकेश बापट या चित्रपटात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे राकेश त्याची ‘चॉकलेट बॉय’ ची इमेज पुसणार हे नक्की.

प्रत्येक व्यक्ती ही आयुष्यात काहीतरी वेगळे आणि मोठे करण्यासाठी प्रयत्नशील असते. त्यासाठी हरेक प्रकारची धडपड माणूस करत असतो. या सगळ्यामध्ये आपली वेगळी ओळख बनविण्यासाठी काही तर हट्टाला पेटतात आणि मिळेल तो मार्ग ते निवडतात. मग भलेही तो मार्ग चुकीचा का असेना. आणि यातूनच तो चुकीच्या मार्गावर जातो. याच संकल्पनेवर आधारित वंश एंटरप्राइजेस प्रस्तुत ‘मुंबई आपली आहे’ हा ‘मुंबई आपली आहे’ सिनेमा आहे. भरत सुनंदा दिग्दर्शित आणि लिखित हा सिनेमा अंडरवर्ल्ड डॉनच्या आयुष्यावर आधारित असणार आहे.

चित्रपटात राकेश सोबत मीनल पाटील हा नवीन चेहरा दिसणार आहे. तर हिंदी मालिका, चित्रपटामध्ये दिसणारा इकबाल खान हा या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे. इकबाल या सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय चित्रपटात जेष्ठ अभिनेते अरुण नलावडे, किशोरी शहाणे-वीज, नयन जाधव हे देखील हटके भूमिकेत पाहायला मिळणार आहे. रुपेश गोंधळी यांनी सिनेमाला संगीत दिले आहे. ह्या चित्रपटाची निर्मिती सुरेखा वामन पाटील यांनी केली आहे.

Comments

More in Upcoming Movies

Like Us on Facebook

Popular Posts

To Top