Connect with us

मराठी कलाकार

अजरामर पिंजरा सिनेमातील गाण्याचं रिफ्रेश व्हर्जन ‘मुंबई पुणे मुंबई-३’ मध्ये! पहा व्हीडिओ

Video Songs

अजरामर पिंजरा सिनेमातील गाण्याचं रिफ्रेश व्हर्जन ‘मुंबई पुणे मुंबई-३’ मध्ये! पहा व्हीडिओ

“कुन्या गावाची, कोनच्या नावाची, कुन्या राजाची गं तू रानी… आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी…ग साजनी” हे ‘पिंजरा’ या १९७२ मध्ये आलेल्या सिनेमातील गाजलेलं गीत. आता हेच गीत पुन्हा एका नव्या रंगात, नव्या ढंगात रसिकांना सरप्रायझिंगली ‘मुंबई पुणे मुंबई-३’ मध्ये बघायला मिळणार आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्यावर हे गीत चित्रित करण्यात आले असून दोघांनीही या गाण्यात फुल्टू धमाल केली आहे आणि त्यांचे हे नृत्य पाहण्यासारखे झाले आहे. सिनेमा जसजसा प्रदर्शनाच्या जवळ येतो तसतशी सिनेमातील सिक्रेट्स रसिकांसमोर आणली जातात. त्यामुळे पिंजरा सिनेमातील गीताचा ‘मुंबई पुणे मुंबई-३’ समावेश असलेलं सिक्रेट आपल्यासमोर आलं आहे.

ढोल ताशांच्या निनादात या गाण्याचे प्रकाशन विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे करण्यात आले. या गाण्याच्या प्रदर्शन सोहळ्यासाठी स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी, सविता प्रभुणे, मंगल केंकरे, विजय केंकरे आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे हे कलाकार उपस्थित होते. प्रख्यात चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्या तुफान गाजलेल्या आणि सामाजिक संदेश देणाऱ्या ‘पिंजरा’ चित्रपटातील हे गाणे ‘मुंबई पुणे मुंबई-३’मध्ये सामील करून ते आगळ्या पद्धतीने चित्रित केले गेले आहे. ‘पिंजरा’तील या गाण्याच्या चित्रपटातील समावेशामुळे रसिकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता त्यामुळे अधिकच ताणली जाणार आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Video Songs

To Top