Connect with us

मराठी कलाकार

‘मुंबई पुणे मुंबई-३’मधील ‘आई तू बाबा मी होणार गं…कुणी येणार गं…’ गाण्याला बेबी शॉवरची थीम.

News

‘मुंबई पुणे मुंबई-३’मधील ‘आई तू बाबा मी होणार गं…कुणी येणार गं…’ गाण्याला बेबी शॉवरची थीम.

पाच वर्षांपूर्वी आलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत एक इतिहास रचला होता. लवकरच या चित्रपटाचा हा तिसरा भाग प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असून अशा पद्धतीने तीन भागात प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. चित्रपटातील ‘आई तू बाबा मी होणार गं…कुणी येणार गं…’ हे गाणे चित्रपटाची हिट जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे आणि संपूर्ण कलाकार चमू यांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आले आहे. गाण्याची थीम पारंपारिक डोहाळजेवण (आता त्याला बेबी शॉवर म्हणतात) समारंभातील आहे.

हृषीकेश रानडे, आनंदी जोशी, सई टेंभेकर, जयदीप बागवाडकर, वर्षा भावे, योगिता गोडबोले आणि मंदार आपटे यांनी ‘आई तू बाबा मी होणार गं…कुणी येणार गं’ हे गाणे गायले असून संगीत निलेश मोहरीर यांनी दिले आहे. तसेच देवयानी कर्वे-कोठारी आणि पल्लवी राजवाडे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. “डोहाळ जेवण ही केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात साजरी होणारी एक जुनी परंपरा आहे. हल्ली त्याला ‘बेबी शॉवर’ म्हटले जाते. हे गाणे एमपीएम-३ या तंत्रावर संपूर्णतः वेगळ्या पद्धतीने साकारले आहे. माझी खात्री आहे कि हे गाणे एक नवीन ट्रेंड सुरु करेल.” असे चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले. कोणत्याही जोडीच्या आयुष्यात महत्वाचे टप्पे असतात. त्याचप्रमाणे स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे साकारात असलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’च्या सिरीजमधील महत्वाचा तिसरा टप्पा आता प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in News

To Top