Connect with us

मराठी कलाकार

‘मुंबई पुणे मुंबई’ चा तिसरा सिक्वेल लवकरच भेटीला. तिसऱ्या भागाची निर्मिती करणारा पहिलाच मराठी चित्रपट.

Upcoming Movies

‘मुंबई पुणे मुंबई’ चा तिसरा सिक्वेल लवकरच भेटीला. तिसऱ्या भागाची निर्मिती करणारा पहिलाच मराठी चित्रपट.

एखाद्या बॉलिवूड सिनेमाचा दुसरा, तिसरा सिक्वेल निघणं हि काही नवी गोष्ट नाही. बॉलिवूड मधील गोलमाल, धमाल, धूम, मर्डर अशा अनेक सुपरहिट सिनेमांचे आपण सिक्वेल पाहिलेले आहेत. पण आता एखाद्या मराठी सिनेमाचा पहिला, दुसरा नव्हे तर तब्बल तिसरा सिक्वेल म्हटलं तर आता नवल वाटायला नको… हो! आजवर मराठी सिनेसृष्टी प्रकारे नवनवीन प्रयोग करत आली असून त्यातीलच हा एक प्रयोग म्हणावा लागेल. आणि मराठी सिनेमेसुद्धा आता तिसऱ्या सिक्वेल पर्यंत पोचतायतं ह्या गोष्टीवर सुद्धा आपल्याला विश्वास ठेवावा लागणार आहे. कारण नुकतीच दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई पुणे मुंबई’च्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही हिट जोडी या तिसऱ्या भागातही दिसणार आहे. या घोषणेच्या वेळी हे दोघेही हजर होते. तिसऱ्या भागाची निर्मिती करणारा ‘मुंबई पुणे मुंबई’ हा पहिलाच मराठी चित्रपट असून स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेची जोडी पुन्हा एकदा दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्याबरोबर काम करणार आहे.

‘मुंबई पुणे मुंबई-१’ हा चित्रपट बरोब्बर आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपरडूपर हिट ठरला. ‘मुंबई पुणे मुंबई-२’ हा दोन वर्षांपूर्वी दिवाळीमध्ये प्रदर्शित झाला होता. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातून रसिकांनी या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, “मुंबई पुणे मुंबई”ला एवढे यश मिळेल असे आम्हाला सुरुवातीला वाटलेच नव्हते.चित्रीकरण करत असताना आम्हाला या चित्रपटाचा पुढचा भाग येईल असेहि वाटले नव्हते. पण दुसऱ्या भागाचे चित्रीकरण करत असताना या चित्रपटाच्या पुढच्या भागालाही वाव आहे, हे मात्र स्पष्टपणे जाणवले होते.”

‘मुंबई पुणे मुंबई-३’ची कथा पल्लवी राजवाडे यांनी लिहिली आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अश्विनी शेंडे आणि पल्लवी राजवाडे यांनी लिहिले आहेत. २८ सप्टेंबर २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Comments

More in Upcoming Movies

Like Us on Facebook

Popular Posts

To Top