Connect with us

मराठी कलाकार

गौतम आणि गौरीच्या संसारात नव्या पाहुण्याची एंट्री.पहा ‘मुंबई- पुणे- मुंबई ३’ चा ट्रेलर.

Movie Trailers

गौतम आणि गौरीच्या संसारात नव्या पाहुण्याची एंट्री.पहा ‘मुंबई- पुणे- मुंबई ३’ चा ट्रेलर.

एकमेकांशी सतत वाद घालणारे मुंबईकर गौरी आणि पुणेकर गौतम, एकमेकांच्या प्रेमात पडतात. हो- नाही करत लग्नाच्या बेडीतही अडकतात. अशी साधी, सोप्पी, सरळ प्रेमाची गोष्ट सांगणारा ‘मुंबई- पुणे- मुंबई’ चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला. गौतम आणि गौरी म्हणजेच स्वप्नील,मुक्ता बर्वेची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली. आता या गाजलेल्या चित्रपटाचा तिसरा भाग पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. नुकताच या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. एकमेकांशी सतत भांडणाऱ्या या जोडीच्या संसारवेलीवर एक गोंडस फुल उमलणार आहे आणि हिच गोष्ट ‘मुंबई- पुणे- मुंबई ३’ मध्ये पाहायला मिळणार आहे.

दोन भागांना प्रेक्षकांकडून मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर तिसऱ्या भागाला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार असून तिसरा भाग येणारा हा कदाचित मराठीमधला पहिलाच चित्रपट असेल. करिअरला प्राधान्य देत संसाराचा गाडा सांभाळणाऱ्या गौरी गौतमच्या आयुष्यात नवीन पाहुणा येणार म्हटल्यावर दोन्ही घरात एकच गडबड गोंधळ सुरू होतो, अशी साधारण हलकीफुलकी कहाणी ‘मुंबई- पुणे- मुंबई ३’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट संपूर्ण राज्यात ७ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Comments

More in Movie Trailers

To Top