Connect with us

मराठी कलाकार

मराठी सिनेमात प्रथमच तिसरा सिक्वेल. ‘मुंबई पुणे मुंबई- ३’चा टीजर लॉन्च.

Upcoming Movies

मराठी सिनेमात प्रथमच तिसरा सिक्वेल. ‘मुंबई पुणे मुंबई- ३’चा टीजर लॉन्च.

स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वे स्टारर ‘मुंबई-पुणे-मुंबई’ पाच वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला आणि सुपर डुपर हिट ठरला होता. लोकप्रियतेसोबतच बॉक्स ऑफिसवरसुद्धा सिनेमानी चांगला गल्ला जमवला होता. सदर चित्रपटाचा सिक्वेल ‘मुंबई पुणे मुंबई- २’ दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला तेव्हा या यशाची पुनरावृत्ती झाली होती आणि हा सिनेमासुद्धा यशस्वी ठरला होता. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर गोवा, गुजरात, कर्नाटक आणि अगदी अमेरिकासारख्या देशांमध्येही चित्रपटाला रसिकांनी भरपूर प्रतिसाद दिला.

कदाचित यामुळेच आता हा सिनेमा तिसरा सिक्वेल घेऊन येत आहे. अशा प्रकारचा मराठीतील हा पहिलाच प्रयत्न असून चित्रपट वर्षाअखेर प्रदर्शित होत आहे. सिनेमाचा टिझर नुकताच लॉन्च झाला असून या चित्रपटातील स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे या लोकप्रिय जोडीने रेखाटलेल्या जोडप्याच्या आयुष्यात पुढे काय घडते त्या प्रवासाची स्पष्ट कल्पना हा टीजर प्रेक्षकांना देतो. याबद्दल दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, “मुंबई पुणे मुंबई” ला एवढे यश मिळेल असे आम्हाला सुरुवातीला वाटलेच नव्हते. ‘मुंबई पुणे मुंबई’ हा आता एक वेगळा ट्रेंड झाला असून प्रेमकथेचा एक वेगळा बाज त्यातून गिरवला गेला आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची आता सवय लागून राहिली आहे. मुंबई पुणे मुंबई’चे चित्रीकरण करत असताना आम्हाला या चित्रपटाचा पुढचा भाग येईल असे वाटले नव्हते. पण दुसऱ्या भागाचे चित्रीकरण करत असताना या चित्रपटाच्या पुढच्या भागालाही वाव आहे, हे मात्र स्पष्टपणे जाणवले होते. येणाऱ्या चित्रपटाच्या कथेबद्दल अधिक काही बोलणे उचित होणार नाही, पण मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो की, हा तिसरा भागही तेवढाच यशस्वी ठरणार आहे.”
‘मुंबई-पुणे-मुंबई-३’ येत्या ७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Upcoming Movies

To Top