Connect with us

मराठी कलाकार

बापरे! बिगबॉसच्या घरात खून! तर “हे”चार सदस्य झाले नॉमिनेट.वाचा अधिक.

बिग बॉस मराठी

बापरे! बिगबॉसच्या घरात खून! तर “हे”चार सदस्य झाले नॉमिनेट.वाचा अधिक.

बिगबॉसच्या घरामध्ये नुकताच कॅप्टनसी टास्क रंगला आणि त्यामध्ये रुपालीने बाजी मारली आणि घराची नवी कॅप्टन बनली. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आगळावेगळा टास्क रंगणार आहे. बिग बॉसच्या घरावर एक मोठे संकट आले असून या संकटातून बाहेर पडण्यासाठी बिग बॉस सदस्यांवर मर्डर मिस्ट्री हे साप्ताहिक कार्य सोपवणार आहेत. या कार्यानुसार बिग बॉस मराठीच्या घरात सांकेतिक खून होणार आहे. प्रत्येक बझरला खून झालेला सदस्य कॅप्टनपदाच्या शर्यतीमधून बाहेर पडेल. शेवटच्या बजरनंतर खुनापासून वाचलेल्या सदस्याला कॅप्टन पदाच्या शर्यतीत फायदा होईल असे बिग बॉसनी जाहीर केले.

बिग बॉस यांनी नेहा आणि शिवला या कार्यामध्ये काय व्हायला आवडेल खुनी की सामान्य नागरिक असे विचारले यावर नेहा आणि शिवने खुनी व्हायला आवडले असे उत्तर दिले आता बघुया यांच्या नशिबामध्ये काय आहे? त्याचप्रमाणे बिग बॉसच्या घरात आलेल्या गुंडांनी अभिजीतचे अपहरण केले आहे. मर्डर मिस्ट्री या टास्कसाठी अभिजीतचे अपहरण झाले आहे. आज काय धम्माल होणार टास्क खेळताना? घरात किती खून होणार हे बघण मजेशीर असणार आहे.

सरतेशेवटी नॉमिनेशन कार्यामध्ये रुपालीने वीणाला तर हिनाने नेहाला नॉमिनेट केले याचे आश्चर्य सगळ्यांनाच वाटले. रुपालीने वीणाला ओवर कॉन्फिडंट म्हटलं आणि अशा सदस्यांना या घरामध्ये जागा नाही असे देखील तिने स्पष्ट केले. हिनाने देखील तिचे परखड मत मांडले. प्रत्येक सदस्यांनी त्यांना वाटणारी कारणे स्पष्टपणे सगळ्यांसमोर मांडली आणि या आठवड्यामध्ये नेहा शितोळे, किशोरी शहाणे, शिव ठाकरे, वीणा जगताप, वैशाली म्हाडे, हिना पांचाळ आणि माधव देवचके घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले.

Comments

More in बिग बॉस मराठी

Like Us on Facebook

Popular Posts

To Top