Connect with us

मराठी कलाकार

नागराज मंजुळेंच्या ‘नाळ’ सिनेमाचा टिझर रिलीज. पहा झलक.

Upcoming Movies

नागराज मंजुळेंच्या ‘नाळ’ सिनेमाचा टिझर रिलीज. पहा झलक.

सैराट आणि फॅन्ड्री सिनेमाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर गेले कित्येक दिवस रसिक नागराज मंजुळेंच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांची उत्सुकता लवकरच संपणार असून नागराज मंजुळेंच्या आगामी ‘नाळ’ या सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. सदर सिनेमा ‘नाळ’ची नागराज मंजुळे निर्मिती करताना दिसणार आहे. यामुळे ते आता आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळतील.

मराठीतील ब्लॉक-ब्लस्टर सिनेमा सैराटचे कॅमेरामन राहिलेले नागराज मंजुळेंचे मित्र सुधाकर रेड्डी हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. आटपाट आणि मृदूगंध फिल्मसची निर्मिती असलेल्या या सिनेमातील संवाद नागराज मंजुळेंनी लिहिलेले आहेत. आपल्या सिनेमात नेहमी नवीन कलाकारांना घेऊन येणारे दिग्दर्शक म्हणून ख्याती असलेल्या नागराज मंजुळेंच्या ह्या ‘नाळ’ सिनेमात एका नवीन लहान मुलाची ओळख रसिकांना होणार आहे. “माझ्या मनातील गोष्ट सुधाकर मांडत असल्याचं” नागराज मंजुळेंनी सांगितलं आहे. हा सिनेमा 16 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Comments

More in Upcoming Movies

To Top