Connect with us

मराठी कलाकार

नागराज मंजुळेंचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस. झी स्टुडिओची घोषणा.

Featured

नागराज मंजुळेंचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस. झी स्टुडिओची घोषणा.

दिग्दर्शन क्षेत्रातील पदार्पणातच फॅन्ड्री सारखा जबरदस्त सिनेमा देणारे आणि पुढे सैराट सिनेमाने सर्वाना वेड लावणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे त्यांचा पुढील सिनेमा कधी घेऊन येणार याची सर्वजणंच वाट पाहत होते. आता नागराज मंजुळेंच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. त्याचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नागराज मंजुळेच्या आजवर सगळ्याच चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओजने केली आहे. विशेष म्हणजे हा आगामी सिनेमा नागराज मंजुळे झी स्टुडिओसोबतच करणार आहे.  झी स्टुडिओच्या ट्विटर हॅण्डलवरुन एक व्हिडीओ पोस्ट करुन याबाबची माहिती देण्यात आली. 22 सेकंदांच्या या व्हिडीओमधून नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओ यांच्या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली.

आगामी चित्रपटाचे नाव मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. नागराज मंजुळेचा आगामी चित्रपट कोणता असणार याबाबत गोपनीयता राखण्यात आली असल्याने फॅन्सना चित्रपटाबाबत उत्सुकता कायम आहे. हि घोषणा करताना सदर ट्विटमध्ये “फँड्री, सैराट… नंतर झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे पुन्हा एकदा एकत्र… लवकरच… “ असं कॅप्शन लिहलेलं आहे. नागराज मंजुळेंनीही स्वत: नव्या प्रोजेक्टचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. फँड्री आणि सैराटमधून सामाजिक विषय हाताळणाऱ्या नागराज मंजुळेचा नवा सिनेमा कोणता असेल हे जाणून घ्यायला चाहत्यांना आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे.

नागराज मंजुळेंचा आगामी चित्रपट देखील अशाच वेगळ्या विषयावर असणार अशी अपेक्षा नेटिझन्सकडून केली जात आहे.

Comments

More in Featured

To Top