Connect with us

मराठी कलाकार

‘जाऊ दे ना वं’ आगामी ‘नाळ’ सिनेमातील गाणं प्रदर्शित.

Video Songs

‘जाऊ दे ना वं’ आगामी ‘नाळ’ सिनेमातील गाणं प्रदर्शित.

काही दिवसांपूर्वी अचानक दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या आगामी सिनेमाची बातमी आली. ‘नाळ’ असं सिनेमाचं नाव असून प्रथमच या सिनेमाच्या निमित्ताने आपल्याला नागराज मंजुळे निर्मात्याच्या रुपाने पाहायला मिळणार आहेत. सदर सिनेमाबद्दल कसलीच कल्पना प्रेक्षकांना नव्हती आणि अचानक आपल्याला सिनेमाचा टिझरच बघायला मिळाला होता. आता सिनेमातील पहिलं गाणं बाहेर आलं असून केवळ आणि केवळ स्वछंदी बालपणाचा अनुभव रसिकांना ह्या गाण्यातून मिळणार आहे.

‘जाऊ दे ना वं’ हे सिनेमातील गाणं आपल्याला सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत असून जयस कुमार यांनी ते गायलेलं आहे. गाण्याची शब्दरचना आणि संगीत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचं आहे. गाण्यातील दृश्ये अतिशय बोलकी आणि मनाला विभावणारी असून ग्रामीण जीवनातील दैनंदिनीच आपल्याला यानिमित्ताने अनुभवायला मिळते आहे. ‘नाळ’हा नागराज मंजुळेंच्या आटपाट प्रोडक्शन्स सोबतच झी स्टुडिओची निर्मिती आहे.

Comments
Continue Reading
Advertisement

More in Video Songs

To Top