Connect with us

मराठी कलाकार

नम्रता आवटेच्या भीतीदायक फोटोमागे लपलंय “हे”सत्य!

Actress

नम्रता आवटेच्या भीतीदायक फोटोमागे लपलंय “हे”सत्य!

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता आवटे नुकतीच सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राच्या हास्यजत्रा या शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये तिने केलेल्या अॅक्टचा लूक तिने सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोची सध्या सगळीकडे खूप चर्चा होत आहे. कारण या फोटोत ती खूपच भयानक लूकमध्ये दिसत आहे. नम्रता आवटे संभेरावने सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर करून या मागचे सत्य सांगितले आहे.

या फोटोविषयी बोलतांना नम्रताने कॅप्शनमध्ये लिहिले कि “या भीतीदायक फोटोमध्ये लपले आहे एक विनोदी सत्य. खूप दिवसांनी एका दिवसाकरिता सामील झाले महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत. हॉरर कॉमेडी. मेकअप मीच केला आहे.” काही महिन्यांपूर्वी नम्रताने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. या बाळाचे नाव रुद्राज असे ठेवले आहे. तिने प्रेग्नेंसी दरम्यान काही काळ अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. आता नम्रता पुन्हा छोट्या पडद्यावर कधी दिसणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

‘व्हेंटिलेटर’, ‘बाबू बँड बाजा’, ‘लूज कंट्रोल’ यासारख्या विविध चित्रपटात नम्रताने महत्वाच्या भूमिका साकारल्या. यासोबतच तिने हिंदीतही आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे. नम्रता आवटेने आपल्या विनोदी कौशल्याने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते.

Comments
Continue Reading
You may also like...

More in Actress

Like Us on Facebook

Popular Posts

To Top